Download App

डबल इंजिन सरकारचा मी ड्रायव्हर, ज्याला बसायचं त्यानं…; दानवेंची टोलेबाजी

Raosaheb Danve On Kailas Goarantyal :  भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( BJP Leader Raosaheb Danve On Kailas Gorantyal )  हे नेहमी आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांची भाषणे ही अस्सल खुमासदार शैलीतील असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची कायम चर्चा होत असते. आता त्यांचे आणखी एक विधान चर्चेत आले आहे. यावेळी ते जालना येथे बोलत होते. त्यांनी बोलताना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना चांगलेच चिमटे काढले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला होता.

जालना नगर परिषदेच्या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज उद्यानात १५०फुट उंच राष्ट्रीय ध्वज आणि मोती तलाव चौपाटीवर रेल्वे इंजिन (लोकोमोटीव्ह) बसविण्याचा भुमिपुजन सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमात दानवे बोलत होते. या कार्यक्रमासाठी  जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,आ.कैलास गोरंट्याल,आ.नारायण कुचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Madha Lok Sabha : राष्ट्रवादीची धाकधुक वाढली; आमदार शिंदे बंधुंची महत्त्वाच्या बैठकीला दांडी

याअगोदर  काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी दानवेंसमोरच टोले लगावले. दानवे यांनी जालना शहरात चांगला विकास केला. मात्र दादांनी रेल्वे इंजिनसोबत आमच्यासारखा एक डब्बाही घेऊन फिरावा, असे गोरंट्याल यांनी म्हटले.

यानंतर रावसाहेब दानवे यांनीदेखील खास आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. तर हे डबल इंजिनचं सरकार आहे. ज्याला बसायचं त्याने बसावं मात्र या ट्रेनचा ड्रायव्हर मी आहे, असे म्हणत गोरंट्याल यांना दानवेंनी प्रतिटोला लगावला आहे. दरम्यान, गोरंट्याल हे 2019 साली शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांना पराभूत करुन आमदार झाले आहे.

Chandrasekhar Bawankule : ‘मी पंकजाताईंच भाषण ऐकलं, BJP माझ्या मागे असल्याचे त्यांनी म्हटलं’

दरम्यान,  2019 च्या लोकसभेसाठी अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मागितली होती. तेव्हा रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यात बराच संघर्ष झाला होता. यानंतर दोघांमधील वाद मिटला होता. पण विधानसभेला अर्जुन खोतकर यांचा कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला. सध्या अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत आले आहे.

Tags

follow us