Atul Bhatkhalkar : फडणवीस खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी; भातखळकरांनी केले कौतुक

भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मुंबईच्या माहिम येथील अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी त्यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणामध्ये काल या अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केला होता. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत फडणवीसांचे कौतुक केले आहे. माहीममधील मजारीच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 23T104855.048

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 23T104855.048

भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मुंबईच्या माहिम येथील अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी त्यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणामध्ये काल या अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केला होता.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत फडणवीसांचे कौतुक केले आहे. माहीममधील मजारीच्या अनधिकृत बांधकामावर जलद कारवाई करत हातोडा मारणाऱ्या गृहमंत्री देवेंद्रजी व खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी शिंदे फडणवीस सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन, असे म्हणत त्यांनी राज्यातील सरकाचे आभार मानले आहेत.

राज ठाकरेंच्या सभेत नेत्यांचा लवाजमा अमित ठाकरे मात्र…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी बोलताना माहिमजवळील अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केला होता. जर हे बांधकाम महिन्याभरात न पाडल्यास त्याच्याशेजारी सर्वात मोठे गणपतीचे मंदीर उभारणार असे राज ठाकरे म्हणाले होते.

आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे एप्रिलमध्ये अयोध्या दौऱ्यावर?

दरम्यान राज ठाकरे यांच्या मागणीला आता यश मिळाल्याचे दिसते आहे. याचे कारण मुंबईच्या प्रशासनाने आज सकाळीच माहिम येथील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले आहे. यावेळी अधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासन देखील उपस्थित होते. तसेच राज ठाकरे यांनी बोलताना सांगली येथील एका आरक्षित मैदानावर मस्जिद उभारण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे बांधकाम देखील लवकर पाडण्यात यावे असे त्यांनी प्रशासनाला सांगितले आहे.

Exit mobile version