राज ठाकरेंच्या सभेत नेत्यांचा लवाजमा अमित ठाकरे मात्र…

राज ठाकरेंच्या सभेत नेत्यांचा लवाजमा अमित ठाकरे मात्र…

मुंबई : मुंबईतील शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंचं भाषण सुरु असताना अमित ठाकरे श्रोत्यांप्रमाणे खाली एका कोपऱ्यात उभं राहून राज ठाकरेंचं भाषण लक्षपूर्वक ऐकत असल्याचं दिसून आले. ठाकरे ब्रॅंड व्यासपीठावर न बसता खाली उभं राहून भाषण ऐकतोय हे पाहुन सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे, किंबहुन सभेत अमित ठाकरेंविषयी श्रोत्यांमध्ये कुजबूजही सुरु असल्याचं दिसून आलं आहे.

राज ठाकरेंचा एक इशारा अन् साफ माहीम किनारा…

शिवसेनेचा दसरा मेळावा तर मनसेचा गुढीपाडवा मेळावा रेकॉर्डब्रेक गर्दीने होत असतो. सभेत व्यासपीठावर कोण-कोणते मान्यवर आहेत, याकडं पक्षातल्या जाणकार माणसांचं लक्ष असतं. मात्र, काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झालेल्या सभेत ठाकरे घराण्याचे सुपूत्र अमित ठाकरे संपूर्ण सभा एका कोपऱ्यात उभं राहून ऐकत असल्याचं दिसून आले.

अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे पुत्र असूनही त्यांनी आपले साधेपणाची ओळख कायम ठेवत व्यासपीठावर न बसता खाली एका कोपऱ्यात उभं राहून राज ठाकरे यांच्या प्रत्येक हरकतींवर लक्ष ठेऊन असल्याचं दिसून आलं. अमित ठाकरे यांचं कालच्या सभेत असं एका कोपऱ्यात उभं राहून सभा ऐकण्याचं कारण समोर आलं नसून मात्र, हे संपूर्ण दृश्य बरंच काही सांगून जात आहे.

काळजी घ्या! राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय…

आपला ठाकरे ब्रॅंड असला तरी आपल्यातला साधेपणा दाखवणारे अमित ठाकरे आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरतील, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. दरम्यान, अमित ठाकरे खाली उभे असताना मनसे नेते बाळा नांदगावकरांनी भाषण थांबवत त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केल्याचं दिसून आलं.

अमितजींचा हा विनम्रपणा इतरांनीही घेतला तर खूप बरे होईल, असंही बाळा नांदगावकरांनी श्रोत्यांना उद्देशून म्हटलं होतं. त्यानंतर अमित ठाकरेंनाही नांदगावकरांची विनंती नाकारता आली नाही. ते उठले आणि व्यासपीठावरील खुर्चीवर येऊन बसले. हा प्रकार सभेस उपस्थित असलेल्या लाखो लोकांसमोर घडला.

दरम्यान, पुढील काळात अमित ठाकरेंना राज ठाकरेंसारखं कणखर, प्रभावी भाषण करता यावं यासाठी ते लक्षपूर्वक राज ठाकरेंच्या शैलीचे अनुकरण असल्याची शक्यता श्रोत्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube