Download App

मामांची हत्या…योगेश टिळेकरांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, पोलीस यंत्रणा…

  • Written By: Last Updated:

BJP Leader Yogesh Tilekar Reaction On Satish Wagh Murder : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर (BJP Leader Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या झालीय. पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. यानंतर आता योगेश टिळेकर यांची प्रतिक्रिया समोर आलीय. ते म्हणाले की, काल याच जागेवरून अपहरण झालं. अपहरण करून खून (Satish Wagh Murder) घडल्याची घटना घडलेली नाही. पोलिस यंत्रणा काम करत आहेत. लवकरच पोलीस यामागचे कारण शोधतील. आमच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस यंत्रणा काम करून लवकरच आरोपींचा शोध घेतील.

आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर नागडं करून मारू; भाजपच्या राम सातपुतेंचं आक्रमक भाषण

काही वेळात याचा सुगावा लागेल, पोलिसांचे काम सुरू आहे. यात राजकारण न करता पोलीस आपलं काम करतील. सामान्य माणूस असो किंवा आमदारांचा मामा असो शेवटी ही यंत्रणा (Pune News) आहे. सामान्य नागरिकांवर अन्याय झाला तरी राज्य सरकार चांगलं काम करते. मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी फोन केले आहेत. माझ्या कुटुंबीयांच्या मागे सर्वजण खंबीरपणे उभे आहेत, असं योगेश टिळेकर म्हणाले आहेत.

स्थलांतरित कामगारांच्या रोजगार वाढसाठी का काम करत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ हे रिअल इस्टेट बिझनेसमध्ये (Pune Crime) होते. त्यांचं स्वत:चं मोठं नाव असून ते योगेश टिळेकर यांचे मामा असल्याने अनेक लोकं त्यांना ओळखतात. सतीश वाघ काल 9 डिसेंबर रोजी सकाळी सोलापूर रस्त्यावरील ब्लू बेरी हॉटेल समोर थांबले असताना अचानक एक चार चाकी समोर येऊन थांबली. त्यातील दोघाजणांनी त्यांना जबरदस्तीने त्या गाडीत बसवलं. वाघ ‘वाचवा वाचवा’ असं ओरडले, त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाने मागे फिरून पाहिलं. त्या व्यक्तीने कारचा पाठलागही केला.

मात्र, कार वेगाने सोलापूर रस्त्याच्या दिशेने गेली. त्यानंतर या व्यक्तीने पाहिलेला प्रकार त्यांच्या घरी जाऊन सांगितला. ही घटना सोमवारी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास फुरसुंगी फाटा येथील ब्ल्यू-बेरी हॉटेल समोर घडली. यानंतर सतिश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार दिली. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेलं होतं.

या घटनेसंदर्भात अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांकडून दिवसभर त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र, काही वेळानंतर पुण्यातील यवत, दौंडजवळ झुडपात त्यांचा मृतदेह सापडला. अपहरणकर्त्यांकडून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज हा वर्तवला जात आहे.

त्यानंतर सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल करत पुणे गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला. मात्र त्यानंतर काही तासांतच यवत गावच्या हद्दीत भाजप आमदार सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून यवत येथील महामार्गाजवळील झुडपात त्यांचा मृतदेह फेकून दिला. आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित तपशील आणि अपहरणामागील नेमका हेतू उघड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत त्यांच्या शरीरावर चाकूने वार केलेल्या खूणा असल्याचं समजतंय.

 

follow us