मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांना चांगलेच राजकीय टोले लगावले आहेत. (Gore) प्रेम वयात करायचं असतं. आता तुमचे प्रेम करायचं वय राहिलं नाही, तुम्ही त्याच्या पुढे गेला आहात. आता थोडा संघर्ष करायला शिका असा थेट वार त्यांनी निंबाळकर यांच्यावर केला आहे. ते सोलापूर येथे बोलत होते.
आयुष्यभर लोकांना त्रास दिला, नेत्यांना त्रास दिला. 20- 20 वर्ष मंत्रिमंडळात काम केल्यानंतर आता सहा महिने सुद्धा कळ सोसेना का? असा सवाल त्यांनी केला. लगेच प्रेमाच्या भाषा सुरु झाल्या. जी परिस्थिती आहे ती सगळ्यांना माहिती आहे. पण प्रेमाची कळ जरा उशिरा आली आहे, असा टोला देखील गोरे यांनी निंबाळकरांना लगावला आहे.
..तर कार्यकर्ते मरतील; भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युतीवर गुलाबराव पाटील यांचं धक्कादायक विधान
सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर घरांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. या पूरग्रस्तांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी केली जातेय. याच मुद्द्यावर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्पेशल पॅकेज जाहीर करणार आहेत असंही ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. यामुळं नदी नाले, धरणे तुडुंब भरली होती. यामुळं मोठ्या प्रमाणात सीना नदीत पाण्यातचा विसर्ग आला होता. त्यामुळं सीना नदीला महापूर आला. यामुळं शेती पिकांचं, घरांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. तर काही जणांची वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे स्पेशल पॅकेज जाहीर करणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं.