Download App

विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज; कल्याण प्रकरणानंतर चित्रा वाघ संतापल्या…

  • Written By: Last Updated:

Chitra Wagh Reaction On Kalyan Minor Girl Rape : कल्याण पूर्वमध्ये 23 डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण (Kalyan Minor Girl Rape) करून तिच्यावर बलात्कार करून हत्या देखील झाली. याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी अन् त्याच्या बायकोला देखील अटक करण्यात आलीय. या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. यावर आता भाजप आमदार चित्रा वाघ यांची (Chitra Wagh) प्रतिक्रिया आता समोर आलीय.

कल्याण प्रकरणावर आमदार चित्रा वाघ म्हणाल्या की, अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक अशी ही घटना आहे. या नराधमाला फाशीच होणार. आम्ही सर्वजण त्या परिवारासोबत (Kalyan Minor Girl Rape Murder Case) आहोत, या कुटुंबाची भेट घेतली. शक्य असतं तर त्या नराधमाचा चौरंगा केला असता, पण ते शक्य नाही. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करा, CM फडणवीसांचे कर्मचाऱ्यांना आदेश

राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज आहे. आम्ही पीडित कुटुंबासोबत आहे. मुलीला वाचवू शकलो नाही, याचं दुःख आहे. यांची विकृती मोडून काढल्याशिवाय (Maharashtra Politics) राज्य सरकार आणि देवा भाऊ गप्प बसणार नाहीत. मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यात या आरोपीला बेल मिळाली होती, त्याला मनोरुग्ण असल्याचे सर्टफिकेट न्यायालयात दाखवले होते आणि सुटला होता. मात्र आता तसं होऊ देणार नाही, असा विश्वास देखील चित्रा वाघ यांनी व्यक्त केलाय.

Kalyan Crime : विशाल गवळीसह त्याच्या पत्नीला 7 दिवसांची पोलीस कोठडी

बहीण आणि त्यांच्या मुलींच्या संरक्षणासाठी देवा भाऊ दिवस रात्र काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस पीडित कुटुंबाला न्याय देतील. संविधानाच्या चौकटीत राहून या आरोपीला फाशीची शिक्षा होणार. दिन भर गये है, देवा भाऊ आले आहेत, एकालाही सोडलं जाणार नाही. एक तासात गुन्हा नोंदवला गेला आणि काही तासात आरोपी पर्यंत पोलीस पोहचले. हा सामाजिक प्रश्न अतिशय गंभीर आहे. आपल्या राज्यातील बहिणी आणि त्यांच्या मुली सुरक्षित रहाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सर्वांचा मोठा बाप देवा भाऊ आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मनोरुग्णचा सर्टफिकेट देण्याऱ्या डॉक्टरचा देखील शोध घेतला जाईल, त्याबाबत देखील अधिक तपास केला जाईल.

 

follow us