Download App

भीषण अपघात! आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील वाहनाने शाळकरी मुलांना उडवलं; दोघं ठार

साताऱ्यातील मानखटाव येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीवरील दोन शाळकरी मुलांना उडवल.

  • Written By: Last Updated:

Satara Accident : साताऱ्यातील मानखटाव येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीवरील दोन शाळकरी मुलांना उडवल्याचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. तर, एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Accident) ही घटना बिदाल जवळील शेरेवाडी येथे घडली. दरम्यान, या अपघातामध्ये गाडीचा चुराडा झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी अन् महायुती आमनेसामने; बदलापूरच्या घटनेवर वार-प्रतिवार

दोघांचा मृत्यू

आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडी दहिवडीनजीकच्या शेरेवाडी फाटा येथून जात असताना, एका स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ३० वर्षीय विवाहित रणजीत मगर आणि २५ वर्षीय अनिकेत मगर यांचा मृत्यू झाला आहे. अनिकेत व रणजीत दोघेही शेरेवाडी फाट्याहून बिदालच्या दिशेने स्कुटीवरुन निघाले होते. यादरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ देखील भरधाव वेगात दहिवडीच्या दिशेने जात होती. यावेळी शेरेवाडी फाटा येथे स्कार्पिओ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेचा  SIT कडून प्राथमिक रिपोर्ट सादर; धक्कादायक माहिती आली समोर

पोलीस कारवाई करतील

त्यावेळी समोरून स्कुटीवरून येणाऱ्या रणजीत व अनिकेतला चिरडून स्कॉर्पिओ ५० मीटर अंतरावर पुढे गेली. यामध्ये अनिकेत व रणजीत दोघे गंभीर जखमी झाले. एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माझा दौरा सुरू होता. माझी गाडी गावात पोहचली होती. एक गाडी मागे होती.. ती गाडी माझ्या ताफ्यासोबत नव्हती. पण मी निघून गेल्यावर हा अपघात झाला. त्या गाडीत माझी लोकं होती. त्यामुळे या प्रकरणात जी असेल ती पोलीस कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

follow us

संबंधित बातम्या