MLA Suresh Dhas Criticized Pankaja Munde In Winter Session 2024 : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरमध्ये सुरू आहे. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे देखील अधिवेशनासाठी नागपुरमध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत (Winter Session 2024) दिली. यावेळी आमदार धस यांनी बीडचं राजकारण आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलंय. मंत्रिमंडळात संधी नाही मिळाली तरी खुशी आहे. संधी नाही मिळाली तरी लढेंगे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
यावेळी बोलताना धस म्हणाले की, मेरी जंग नावाचा चित्रपट पाहिलेला आहे. रोज सगळ्यांना चंद्र, सूर्य, तारे दिसत नसतात असा टोला धस यांनी लगावला आहे. बीडला दोन कॅबिनेट मंत्रिपद मिळालेत. अतिशय चांगलं झालंय. आमच्या जिल्ह्याला दोन कॅबिनेट मिळालेले (Pankaja Munde) असून एकाच घरात दोन मिळालेले आहेत. त्या दोघांनीही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करावं. जास्तीत जास्त निधी आणावा. लोकांची ऊसतोडी, हमाली बंद करावी, आम्ही देखील त्यांना समर्थन करू असं देखील धस म्हणालेत.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका, सेन्सेक्स 1064 अंकांनी घसरला, ‘हे’ आहे कारण
दोन घरात दोन मंत्रिपद जायला हवी होती का? या प्रश्नावर बोलताना आमदार (BJP) धस म्हणाले की, असं काही नाही. पक्ष वेगवेगळे आहेत. भारतीय जनता पार्टीकडून पंकजाताईंना संधी मिळाली, अजित पवार यांच्या पक्षाकडून धनंजय मुंडे यांना संधी मिळाली. एक घर आहे. परंतु आजपर्यंत एकमेकांच्या विरोधातच होते. 2019 पर्यंत ते दोघे एकमेकांच्या विरोधात होते. राजकीय अपरिहर्यता पुढे आहे. आम्ही तिन्ही पक्ष आहोत. पक्षाचे प्रतिनिधी या नात्याने ते आलेत. दोघांनाही संधी मिळाली, आमचं काहीच म्हणणं नाही. संधी मिळाली नाही म्हणून नाराज नाही. जीत जाएंगे ये जंग… असं देखील धस यांनी स्पष्ट केलंय.
एर्टिगा आणि इनोव्हाला विसरा… येत आहे ‘ह्या’ 3 स्वस्त 7-सीटर कार्स, किंमत फक्त 6 लाख रुपये
पंकजा मुंडे या मंत्री झाल्यात. परंतु त्यांना शुभेच्छा देणार नाही असं देखील धस म्हणालेत. त्यांनी माझ्या विरोधात काम केलंय. त्यामुळे त्यांना शुभेच्छा नाही देवू शकत. परंतु जो कोणी पालकमंत्री म्हणून येईल, त्यांचं आम्ही फुलांनी स्वागत करू. पण सरकारी रेस्ट ऑफिसवर जावून अभिनंदन करू, त्यांच्या पाठीमागे पळणार नाही. माझ्याच नाही तर त्यांनी अजून बऱ्याच जणांच्या विरोधात काम केलंय. विरोधात उमेदवार उभे केले होते. त्यांनी त्यांच्या अर्जांचं देखील समर्थन केलं होतं. भीमराव धोंडे पाटील होते. स्पष्टपणे त्या माझ्या विरोधात आहेत, त्यामुळे मला घाबरण्याचं काही काम नाही, असं देखील धस म्हणालेत.
पक्षश्रेष्ठींना वाटलं मिटवायचं तर मिटवायचं, अन्यथा जे चालू आहे ते चालूच राहील. पंकजा मुंडे नसल्या तरी मला मतं देणारा वंजारी समाज आहे. मी म्हणजेच वंजारी समाज असा गोड समज त्यांनी केलाय. वंजारी समाजात देखील 30 टक्के मला माननारे माणसं आहेत. मी कोणाची तोंडस्तुती करणाऱ्यांपैकी नाही, असं देखील धस यांनी ठणकावून सांगितलं आहे. आम्ही लोकसभेला प्रामाणिकपणे काम करायचं आणि तुम्ही विधानसभेत अपक्ष उमेदवार उभा करायचा, याला गद्दारी नाही म्हणत तर कशाला म्हणता असा सवाल देखील आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलाय.
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावर बोलताना धस म्हणाले की, जर वाल्मिक आण्णा कराड यांचे कॉल डिटेल्स सापडले असतील तर, मारा झोडा…याचे हातपाय तोडा असे आदेश दिले असतील तर ते या प्रकरणात आरोपी होतील. तोपर्यंत वाल्मिक आण्णा कराड आणि धनंजय मुंडे हे या प्रकरणातील आरोपी आहेत, असं मी म्हणणार नाही. पालकमंत्री कोण असावेत, हे राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एकत्रित बसून ठरवतील. याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रडणारे नाही तर लढणारे आहोत, असं देखील आमदार सुरेश धस यांनी लेट्सअप मराठीसोबत बोलताना सांगितलं आहे.