Download App

बीडच्या गुन्हेगारीवर सुरेश धसांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, बिंदूनामावलीचाही मुद्दा मांडणार, पोलिसांवरही संशय

या कालावधीत कृषी सहायकांनी संप करायला नको होता. शिवराज दिवटेला न्याय मिळाला पाहिजे. मोठी गँग आतमध्ये गेली आहे.

Suresh Dhas : बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरही (Dhas) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारलेली नाही. शिवराज दिवटे याच्यावरील हल्ला साधा नाही. उर्वरित आरोपींना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

त्याचबरोबर पोलीस नेत्यांसाठी काम करत असल्याचा आरोप करत त्यांना जिल्ह्याबाहेर हलवण्याचीही मागणी धस यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगीतलं. या उद्या किंवा परवा होणाऱ्या बैठकीला काही लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहतील, असंही त्यांनी नमूद केलं.

बीड जिल्ह्याची ती ओळख होऊ देणार नाही; गेवराईत अजित पवारांकडून जातीय वादावर भाष्य

त्याचबोरबर बिंदुनामावलीबाबत फक्त दोन घटकांकडं पाहिले जातं. मात्र, बिंदुनामावलीचे पालन न केल्याचा फटका एससी, एसटी आणि ओबीसीतील इतर घटकांनाही बसल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत.

या कालावधीत कृषी सहायकांनी संप करायला नको होता. शिवराज दिवटेला न्याय मिळाला पाहिजे. मोठी गँग आतमध्ये गेली आहे. जेल प्रशासनावर गंभीर आरोप करत धस म्हणाले की, काही आरोपींच्या बेल होऊनही त्यांना आतच ठेवलं जात आहे. हे अतिशय गंभीर असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

follow us