काही संबंध नसताना शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण केली; सुरेश धस यांनी केला मोठा आरोप

Suresh Dhas on Shivraj Divate : भाजप आमदार सुरेश धस यांनी शिवराज दिवटे व कुटुंबाची भेट घेतली. सुरेश धस यांनी परळी व जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचा पाढा वाचला. बहुतांश तरुण नशेच्या आहारी गेली असल्याचे सुरेश धस म्हणाले. (Dhas) याप्रकरणी सदर पोलीस जबाबदार असल्याचा आरोपही धस यांनी केला. शिवराजच्या पाठीशी खंबीर उभे राहू असा विश्वास त्यांनी दिवटे कुटुंबाला दिला.
कायदा व सुव्यवस्थेबाबत मुंबईत बैठक होईल. त्यावेळी आम्ही हा विषय मांडू. शिवराज दिवटे याचा यात काही संबंध नसताना त्याला मारहाण झाली आहे. गुन्हेगारांनी कोणतीही माहिती न घेता शिवराज दिवटे याच्यावर केलेला तो हल्ला आहे असा थेट आरोप सुरेश धस यांनी केला आहे. यामध्ये सात आरोपी अटक झाले आहेत म्हणून आम्ही समाधानी आहोत. परंतु, पोलिसांना विनंती उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी असंही ते म्हणाले आहेत. दिवटेला न्याय मिळालाच पाहिजे असंही ते म्हणालेत.
आरोपी माझा संतोष देशमुख पार्ट 2 करणार होते, शिवराज दिवटेनं सांगितली आपबिती
बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि व्हायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओमुळे बीडचे वातावरण चांगलं तापलं आहे. यचपार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना, अल्पवयीन मुलांचा या प्रकरणात समावेश असल्याचं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संबंधित व्हिडिओत भाषेचा खालचा स्तर वापरला आहे. अल्पवयीन मुलांवरही कारवाई करण्याची एसपींकडे मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
ते म्हणाले की, ज्याप्रकारे पुणे पोर्शेप्रकरणात अल्पवयीन मुलाला शिक्षा देण्यात आली. त्याप्रमाणे अल्पवयीन मुलांना सुज्ञानाप्रमाणेच शिक्षा द्यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. काही आरोपी हे पोलिसांच्या अटकेत आहेत. मात्र, काहीजण पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं आणि त्यांना अटक करावी. त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असे म्हणत सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, 19 मे दिवशी या मारहाणप्रकरणाच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदची हाक अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. मात्र, बीड जिल्हा बंदची हाक स्थगित करण्याचा निर्णय बीडकरांनी घेतला. दरम्यान, आंदोलन सुरुच राहणार असल्याचं बोललं जातंय.