both NCP parties come together Vikas Lawande explained the formula : गेल्या काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टला मुलखात देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्याच दरम्यान पक्षात फुट पडलेल्या राष्ट्रवादीचे दोन्ही गट देखील एकत्र येऊ शकतात. अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांच्या नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावर आता शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले विकास लवांडे?
दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील किंवा एकत्र येऊ शकतात अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये वारंवार जाणीवपूर्वक पेरल्या जातात. मात्र वास्तविक पाहता राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षआणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये खटला दाखल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इंडीया आघाडीतील महत्त्वाचा घट पक्ष आहे. तर अजित पवारांचा राष्ट्रवादी हा भाजपसोबत महायुतीमध्ये सत्तेत आहे.
मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजनांची गरज नाही, जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
मात्र जर कुणाला हे दोन्ही पक्ष एकत्र यावे असं वाटत असेल किंवा तशा बातम्या कुणी पेरत असतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की, हे दोन्ही पक्ष तेव्हाच एकत्र येऊ शकतील जेव्हा अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष महायुतीतून आणि सत्तेतून बाहेर पडेल आणि प्रतिगामी भारतीय जनता पक्षाशी असलेलं नातं तोडेल. तेव्हाच हे दोन्ही पक्ष एक येण्याचा विचार होऊ शकतो. पण या सर्व अफवा आहेत. ते एकत्र येण्याच्या बातम्या कुठेही तथ्य नाही. असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ शकतात यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
…तरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ शकतात
–#NCP #Toghether #Maharashtra #marathinews #Letsuppmarathi @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @VikasLawande1राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांवर आता शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. pic.twitter.com/tFjl9pArIL
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 2, 2025
Video : शशी थरूर भाजपात जाणार?; मोदींच्या सोबत हस्तांदोलन अन् चेहऱ्यावरील हास्यानं चर्चांना उधाण
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. पुण्यातील साखर संकुलात आयोजित तांत्रिक विषयावरील बैठकीच्या निमित्ताने (Sharad Pawar) दोघेही एकत्र आले होते. या बैठकीत अजित पवारांना शरद पवारांसोब झालेल्या बैठकीबाबत विचारलं असता त्यांनी प्रश्नाला बगल दिली होती.
तुम्ही गेल्या काही दिवसांता अनेक दा भेटलात असं विचारलं असता ते अजित पवार म्हणाले, मागं कुटुंबाचा एक सोहळा झाला त्यामध्ये आम्ही एकत्र आलो. पुन्हा रयतमध्ये भेटलो. आता तिथ रयतशी संबंधीत असल्याने आम्ही जातो. त्यामुळे यामध्ये कोणतंही राजकारण आणत नाही. यामध्ये फक्त विकासाची काम असल्याने आम्हाला जाव लागत. राजकारणासारख यात काही नाही असं म्हणत मुख्य प्रश्नाला अजित पवारांनी बगल दिल्याचं पाहायला मिळालं होतं.