मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजनांची गरज नाही, जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजनांची गरज नाही, जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

Jitendra Awhad On Prakash Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी जोरदार टीका करत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले लहानपणी देवपूजा करत होतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते त्यांची मुंज झालेली पण दाखवू शकतात. अशी टीका केली होती तर आता या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश महाजन यांना प्रत्युत्तर दिला आहे.

मी हिंदू आहे हे सांगायला कुठल्या महाजनची गरज नाही. अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश महाजन यांच्यावर केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

यावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, प्रकाश महाजन यांनी जितेंद्र आव्हाड यांना हिंदू आहे हे दाखवण्यासाठी मंदिर बांधावा लागलं, अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर मला हिंदू हे सांगण्यासाठी कुणा महाजनांची गरज नाही हे मंदिर मी चार वर्षांपूर्वीच बांधलं होतं आज फक्त त्याचा जिर्णोद्धार अर्थात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिर एका बाजूला हे आमचं काम होतं आणि आम्ही ते पूर्ण केल आहे. त्यांना जर मुंज करायचे असेल, तर त्यांनी ती करावी. आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्व अधिकार मिळाले आहेत. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, समस्त बहुजनांची उभ्या महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानी आईचे हे प्रति तुळजापूर देऊळ असंख्य भक्तांचे शक्तीस्थान ठरेल. इतिहास साक्षी आहे, छत्रपती शिवरायांचे देखील तुळजाभवानी मंदिर प्रेरणास्थान होते. आई तुळजाभवानीनेच उभ्या महाराष्ट्राला मोगलाई विरोधात उभे ठाकण्याची ताकद दिली. आमच्यासारख्या बहुजनांना तुमच्यासारख्यांनी पिढ्यानपिढ्या वंचित ठेवले. शिक्षण, पाणी, न्याय आणि हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाहीये. ते तुम्हालाच लखलाभ असू द्या आणि हो आपणही संपूर्ण कुटुंबासहित उभ्या महाराष्ट्राची कुलदेवी असणाऱ्या तुळजाभवानी आईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. आपले मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे स्वागतच असेल. जय तुळजाभवानी!  असेही ते म्हणाले.

करिश्मा अन् करीनानंतर कातील लूकसह कपूर घराण्याची आणखी एक मुलगी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले. शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात, ही हिंदूंची ताकद आहे. असं मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube