लवांडे यांच्या केसालाही धक्का लागला तर…रोहित पवार पोलिस ठाण्यातच आक्रमक

Rohit pawar- पोलीस प्रशासनाने यासंदर्भातील आर्म ॲक्टनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलंय.

Rohit Pawar Vikas Lawande Pune

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे ( Vikas Lawande) यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे व त्यांच्या साथीदाराने शाईफेक करत धक्काबुक्की केली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. लवांडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तरीही दबावाखाली असलेल्या पोलीस प्रशासनाने यासंदर्भातील आर्म ॲक्टनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलंय.

शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचारात महाराष्ट्र 1 नंबरवर, एमसीआरबी’चा धक्कायादक अहवाल

यावरून पोलिसांवर किती दबाव आहे हेच दिसून येतं. असं असेल तर या गुन्ह्याचा तपास खरंच पारदर्शक पद्धतीने होईल का आणि भर दिवसा कायद्याला न जुमानता मस्ती करणाऱ्या गुंडांविरोधात कारवाई होईल का, याविषयी आमच्या मनात शंका आहे. पण या गुन्ह्याच्या तपासाकडं आमचं लक्ष राहिल. तसंच लवांडे यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील, याची सरकारने नोंद घ्यावी, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

आई न राहता माझी अतिशय जवळची मैत्रिण बनली; अभिनेत्री दीप्ती केतकरच्या आईबद्दल आठवणी

या हल्ल्याच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे दुसऱ्या राज्यातून येऊन अनेक भोंदूबाबा जगद्गुरु संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं आणि आक्षेपार्ह बोलतात त्यावेळी हे भोंदू मूग गिळून बिळात लपून बसतात, असा आरोपही रोहित पवार यांनी केलाय.

आजच्या हल्ल्याने बंधूभाव, शांतता आणि समता प्रस्थापित करणाऱ्या वारकरी संप्रदायात स्वतःला वारकरी म्हणून घेणाऱ्या कट्टरतावादी गुंडांनी घुसखोरीच केली, हे सिद्ध झालं. त्यामुळं भविष्यात संतांचा खरा विचार जपण्यासाठी या घुसखोरांविरोधात संघर्ष करण्याची वेळ आली, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलंय.

follow us