Download App

स्वप्नील कुसळेची कांस्य पदकाला गवसणी; CM शिंदेंकडून 1 कोटी रुपयांचं बक्षीस…

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक पटकावणाऱ्या स्वप्निल कुसळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय.

Swapnil Kusale : भारतीय नेमबाज स्वप्निल कुसळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलीयं. दरम्यान, पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. स्वप्निलने कांस्यपदक पटकावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वप्निलसह कुटुंबियांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलायं.

Sonu Sood: फतेहच्या रिलीजच्या तारखेची घोषणा आणि चाहत्यांनी अभिनेत्याला दिली ‘ही’ खास गोष्ट

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खाशाबा जाधव यांच्यानंतर भारताला तब्बल 72 वर्षांनी वैयक्तिक खेळामध्ये कांस्यपदक मिळालं असून कोल्हापुरच्या छोट्याशा गावातील स्वप्निलने इतिहास रचला आहे. स्वप्निलसह त्याचे प्रशिक्षक विश्वजीत शिंदे आणि दिपाली देशपांडे, सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार मानत आहे. या यशाबद्दल आम्हाला स्वप्निलचा अभिमान आणि गौरव असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

IPL 2025 साठी नाही होणार मेगा लिलाव, शाहरुख खान का संतापला? वाचा, बैठकीची Inside Story

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्रमवारीत स्वप्नील कुसळेने पहिल्या सीरीजमध्ये ५१.१ आणि दुसऱ्या सीरीजमध्ये ५०.४ म्हणजेच एकूण १०१.५ गुण मिळवले. म्हणजेच त्याचा एकूण स्कोअर ४२२.१ होता आणि तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला. इथून पुढे आव्हान आणखी गंभीर होते. पण इथून पुढे स्वप्नील कुसळेने मागे वळून पाहिले नाही. एलिमिनेशनमध्ये त्याने शानदार पद्धतीने कांस्यपदक पटकावलं.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वप्निल कुसळे याचं मनभरुन कौतूक केलं असून ते म्हणाले, महाराष्ट्राला स्वप्निल कुसळे याचा सार्थ अभिमान असून खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक खेळात कोणीही कांस्यपदक मिळवलेलं नव्हंत मात्र, स्वप्निलने हे पदक भारताला मिळवून दिलं आहे. स्वप्निलने खरोखर दमदार कामगिरी केली असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

follow us