Devendra Fadnavis on Governor Address : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये राज्यपालांचा अभिभाषणावर संबोधित केलं. यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत सहभाग घेतलेल्या आमदारांची नावं वाचून दाखवली आणि जवळपास 17 टक्के आमदारांनी राज्यपालांच्या (Devendra Fadnavis ) अभिभाषणावर चर्चेत सहभाग घेतल्याचं सांगितले. मात्र, हे सांगत असताना त्यांनी नाना पटोले यांचा चर्चेमध्ये सहभाग झाला नसल्याचं दाखवून देत खोचक टिप्पणी केली.
राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर! अर्थमंत्री अजित पवारांनी अहवाल मांडला; वाचा, काय आहे सत्य?
फडणवीस म्हणाले की नानाभाऊंनी चर्चेत का सहभाग घेतला नाही? की नानाभाऊंचं नाव काँग्रेसने इतर सुद्धा कापलं आहे? आमच्या विदर्भाचा बुलंद आवाज असा कोणी दाबायचा प्रयत्न केला तर ते बरोबर नसल्याची खोचक टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. नानाभाऊ आमचा बुलंद आवाज असल्याचे ते म्हणाले. गेल्या चार दिवसांपासून ते रंगीबेरंगी कपडे घालून घेत होते त्यामुळे ते वेगळ्या मुडमध्ये आहेत का? असे वाटत होते. मात्र, आज ते पुन्हा एकदा पांढऱ्या कपड्यात आल्याची टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री भाषणात काय म्हणाले?
सोयाबीन खरेदी ही विक्रमी आहे. मध्य प्रदेश हा सर्वाधिक सोयाबीन उत्पादक राज्य आहे. मात्र, सर्वाधिक खरेदी महाराष्ट्र केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक खरेदीचा रेकॉर्ड मोडला आहे. काही लोकांची खरेदी राहीली आहे. तसंच, तुर खरेदी करायला गोडाऊन नाही, त्यामुळे खासगी गोडाऊन घेऊन आपण तूर खरेदी केली आहे असंही ते म्हणाले.
सिंचनाच्या क्षेत्रात मोठ काम आपण केलं आहे. महाराष्ट्रातला कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. 426 किमीचे नवीन कालवा तयार करत आहोत. त्याचा सात जिल्ह्यांतील 10 लाख एकर जमिनीला फायदा होईल. प्रकल्प अहवाल तयार होऊन काम सुरू करायला दोन वर्ष लागतील. मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी आपण निविदा काढली आहे असंही ते म्हणाले. जायकवाडी वरील बाजूस धरणे बांधली त्यामुळे तूट निर्माण झाला. त्यामुळे वाद निर्माण होतात, ते बंद होतील. पिण्यासाठी मराठवाड्यात पाणी उपलब्ध होईल. त्याचबरोबर संभाजीनगर व जालना हे नवीन औद्योगिक क्लस्टर निर्माण होत आहे, त्याला या पाण्याचा फायदा होईल असंही ते म्हणाले.