Buldhana Deulgaon raja Violent between two groups near police station corporator and Ajit Dada’s activist die : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या गेटजवळच हा रक्तरंजित संघर्ष झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढविला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
राज ठाकरेंच्या SIR रद्द करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, 9 मुद्द्यांतून काय म्हणाले?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरात आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान बसण्याच्या जागेवरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा असलेला हा वाद नंतर चिघळला. त्यातून दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि पुढे त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. वादानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र पोलीस ठाण्याच्या गेटजवळच दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले आणि तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या संघर्षात दोघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विवेकानंद पाटील यांना घर बांधून देणार, विश्वजीत कदमांची मोठी घोषणा
पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच गंभीर स्वरूपाची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मृतांमध्ये शिंदेसेनेचे विद्यमान नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. अन्वर शेख, आरिफ शेख अशी मृतांची नावे आहेत. हाणामारीतील दोन्ही मृतदेह व काही जखमी जालन्यात आणले होते. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने रुग्णालय परिसरात बंदोबस्त वाढवत गर्दी नियंत्रणात आणली.
