कॅप्टन अशोक खरातचा घृणास्पद कारनामा; महिलांना लघवी पिण्यास भाग पाडल्याचा आरोप

महिलांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि आक्षेपार्ह व्हिडिओंचा साठा तपासातून समोर येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

Untitled Design 51

Untitled Design 51

Captain Ashok Kharat’s heinous act : नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि आक्षेपार्ह व्हिडिओंचा साठा अशा धक्कादायक बाबी तपासातून समोर येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात महिलांना भविष्य सांगण्याच्या नावाखाली नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील आपल्या कार्यालयात बोलवत असे. सुरुवातीला विश्वासात घेतल्यानंतर तो महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याचे आरोप आहेत. काही महिलांवर मानसिक दबाव टाकून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती पुढे आली आहे. तर काही महिलांना केबिनमध्ये बोलावून अत्यंत अपमानास्पद वर्तन करण्यास भाग पाडल्याचेही तपासात समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने समाजात संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक क्राइम ब्रँचने अशोक खरातला अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

बर्फवृष्टीतून सुखरूप बाहेर पडले, पण परतीच्या प्रवासात अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू

तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या डिजिटल पुराव्यांमधून अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ एका घटनेपुरता मर्यादित नसून अनेक वर्षे सुरू असलेल्या शोषणाच्या जाळ्याचा भाग असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अशोक खरातकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि काही सेलिब्रिटी भविष्य जाणून घेण्यासाठी येत असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. त्याचे काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे परिमाण मिळाले आहे. विशेष म्हणजे, सिन्नर तालुक्यात अशोक खरातने ‘श्री शिवनिका संस्थान’ या मंदिराची स्थापना केल्याची माहिती आहे.

या संस्थानाशी काही प्रभावशाली व्यक्तींची नावे जोडली जात असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. या ट्रस्टशी रूपाली चाकणकर यांचे नाव जोडले गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असून अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहितीही तपासली जात आहे. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version