Download App

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; महाराष्ट्र पोलिसांबद्दल ‘ते’ वक्तव्य भोवलं

Case registered against MLA Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र पोलिसांवर आक्षेपार्ह विधान करणं, त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील संजय गायकवाड यांच्यावर प्रचंड संतापले (Maharashtra Police) होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय गायकवाड यांना कडक शब्दांत समज द्यावी, अशी तंबीच फडणवीसांनी दिली होती.

मोठी बातमी! POK मध्ये इमर्जन्सी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; पाकिस्तानात काय घडतंय?

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, गुन्हा दाखल झालाय तर मी त्याला सामोरं जाईल. मी जे वक्तव्य केलंय, यात चुकून महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झालाय. मला स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचं होतं. परंतु महाराष्ट्र पोलिसांचं धाडस अन् कर्तृत्व कधीच विसरता येणार नाही. परंतु माझ्या वक्तव्याने ज्या चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांना मनस्ताप झालाय, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतोय.

महिंद्राची खास स्ट्रॅटेजी! SML इसुजूत साडेपाचशे कोटींची भागादारी अन् वाहन बाजारातही दावेदारी

संजय गायकवाड यांनी म्हटलंय की, काही लोकांमुळे मात्र पोलीस बदनाम झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस यांच्याबद्दल बोललेले शब्द मी मागे घेतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आभारयात्रेसाठी बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत. आमदार गायकवाड यांनी या दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांसंदर्भात वक्तव्य केलं होतं.

आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य काय?
महाराष्ट्र पोलिसांवरशिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगामध्ये कुठेही नाही, असे विधान संजय गायकवाड यांनी केले. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर 50 हजारच दाखवतात, असा आरोप देखील संजय गायकवाड यांनी शुक्रवारी केला होता. राज्यातील अन् देशातील पोलिसांनी इमानदारीने काम केलं तर जगातील सर्व गुन्हेगारी समाप्त होऊ शकते. फक्त पोलिसांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांचं हेच वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय.

 

follow us