Youth viral Offensive video of minor girl In Dhule : धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ (Offensive video of minor girl) व्हायरल करणाऱ्या तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे. या प्रकरणी धुळे सायबर पोलिसांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. आपण या प्रकरणाबद्दल (Dhule news) सविस्तर जाणून घेऊ या.
नक्की काय घडलं?
धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीची एका 21 वर्षीय तरुणांसोबत स्नॅपचॅट वरून ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झालं. या तरुणाने या अल्पवयीन मुलीला वेळोवेळी शहरातील एका नामांकित ओयोवर नेऊन त्या ठिकाणी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित (Dhule Crime) केले. विशेष म्हणजे या तरुणाने आपल्याच मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केलं. या अल्पवयीन मुलीचे आणि या 21 वर्षे तरुणाचे मधल्या काळात ब्रेक-अप झाले. त्यानंतर त्याने तिला वारंवार तिचे अश्लील व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती.
रुपाली ठोंबरेंविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल; आमदार जितेंद्र आव्हाड संतापले, काय आहे प्रकरण?
तसेच तिच्याकडून वेळोवेळी पैशांची देखील मागणी केली होती. मात्र या तरुणाने इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. त्यानंतर संबंधित तरुणीने वारंवार आत्महत्येचा प्रयत्न देखील केला, मात्र, याबाबत तिच्या पालकांनी धुळे सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर संबंधित पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या 21 वर्ष तरुणाला ताब्यात घेतलं. त्याच्यावर पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी! मंत्रिपद मिळालं… तरीही प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास शेलार-बावनकुळेंचा नकार, कारण…
विशेष म्हणजे या तरुणाने इंस्टाग्रामवर त्या मुलीच्या नावानेच फेक अकाउंट तयार करून व्हिडिओ व्हायरल केले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच ज्या नामांकित ओयो हॉटेलवर नेऊन हा तरुण अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत होता, त्या हॉटेल चालकाविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल चालकाने अल्पवयीन मुलीचे आयकार्ड न तपासता जास्तीचे पैसे देऊन त्यांना रूम उपलब्ध करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार यातून समोर आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यात घटना उघडकीस आली आहे, एक अल्पवयीन मुलगी आणि 21 वर्षीय मुलाची स्नॅपचॅटद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर काही काळ ते रिलेशनमध्ये होते. ते एका ओयो हॉटेलमध्ये जायचे. या मुलाने त्या मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले होते. आता या प्रकरणी या तरूणास अटक करण्यात आलीय. पुढील तपास सुरू आहे.