Dhule News : गणेशोत्सवानंतर पडळकरांना काळंच फासणार; अजितदादा समर्थकांनी पेटवलं रान…

Dhule News : गणेशोत्सवानंतर पडळकरांना काळंच फासणार; अजितदादा समर्थकांनी पेटवलं रान…

Dhule News : गणेशोत्सवानंतर गोपीचंद पडळकरांच्या(Gopichand Padalkar) तोंडाला काळं फासणार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) समर्थकांनी रान पेटवल्याचं दिसून येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी(Gopichand Padalkar) अजित पवार(Ajit pawar) यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर धुळ्यात आज अजित पवार समर्थकांकडून गोपीचंद पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारुन आंदोलन करण्यात आलं.

IND vs AUS : एकदिवसीय मालिकेत अश्विन 21 महिन्यांनी परतला, रोहित-आगरकरचा नेमका प्लॅन आहे तरी काय?

धुळे शहरातील झाशी राणी चौकात असलेल्या नूतन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध यावेळी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पडळकरांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज तीव्र निषेध करण्यात आला.

आशिया कप जिंकल्यानंतरही भारताला मोठा धक्का, आयसीसी क्रमवारीत पाकिस्तान नंबर वन

सणासुदीचे दिवस असल्याने आम्ही आज आंदोलन करीत नाही पण गणेशोत्सवानंतर गोपीचंद पडळकरांना काळे फासून तीव्र आंदोलन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व काय आहे हे जनतेला दाखवून देणार असल्याचं कैलास चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.

विशेष अधिवेशनाचा राज्यघटनेत उल्लेखच नाही; मग आतापर्यंत 8 वेळा कसे झाले विशेष अधिवेशन

तसेच गोपीचंद पडळकर यांना जेवढे मत पडले नाही तेवढे जोडे राष्ट्रवादीच्या महिला तथा युवक कार्यकर्त्यांनी चपला त्यांना मारल्या आहे, तरी सदर व्यक्ती ही सुधारत नाही झणझणीत तिला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलास चौधरी यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या :
अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत आहेत. सत्तेत असताना अजित पवार यांचा मित्रपक्ष त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करतो, हे अतिशय वाईट आहे. भाजपानं मोठ्या मनानं अजित पवारांना सत्तेत बरोबर घेतलं. पण, अजित पवारांचा अपमान करण्यासाठी बरोबर घेतलं का? याचं उत्तर भाजपानं दिलं पाहिजे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मित्रपक्षाबद्दल बोलण्याची ही कुठली पद्धत आहे, हे दुर्दैवी आहे. हा अजित पवारांचा अपमान असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं आहे.

पडळकरांच्या विधानावर फडणवीस काय म्हणाले?
गोपीचंद पडळकरांच वक्तव्य अयोग्य असून अशा प्रकराचं विधानं करणं चुकीचंच आहे. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. या प्रकारच्या भाषेचा वापर करू नये, या शब्दांत फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना सुनावलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube