Download App

मोठी बातमी! इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील; अवघ्या चार दिवसात केंद्रानं बदलला निर्णय

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली :  उसाच्या रसापासून थेट इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर केंद्रातर्फे बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता अवघ्या चार दिवसात केंद्राने घेतलेला हा निर्णय अखेर बदलला आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना मोठा दिलास मिळाला आहे. केंद्राने ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीसाठी हिरवा कंदील दिला असून, या निर्णयामुळं 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुणे मेट्रोला ब्रेक? येरवडा-रामवाडी स्थानके दुसरीकडे हलवा; स्थानिकांची ‘महामेट्रो’ला नोटीस

का घेण्यात आला होता बंदीचा निर्णय?

साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनासाठी बंदी घातण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतची अधिसूचनादेखील केंद्र सरकारकडून काढण्यात आली होती. केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक स्तरातून टीका केली जात होती.

केंद्राच्या निर्णयाचं स्वागत पण…

केंद्र सरकारने ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉलच्या निर्मितीला दिलेल्या परवानगीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी (Raju Shetty) स्वागत केले आहे. बंदी घालण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता असे म्हणत त्यांनी 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करावा अशी अट सरकारनं घातली आहे. ती अट वाढवून 35 टनांपर्यंत करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे.

Mumbai Indians ला मोठा फटका! रोहितची कॅप्टन्सी गेल्याने फॉलोअर्स घटले; चेन्नईला फायदा

बंदीच्या निर्णयानंतर काय म्हणाले होते शिंदे-पवार?

इथेनॉल निर्मितीच्या बंदीनंतर अनेक स्तरावरून यावर टीका केली जात होती. या सर्वांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कांदा निर्यात बंदी, इथेनॉल या संदर्भात आपण दिल्लीतील वरिष्ठांशी बोलून शेतकऱ्यांनी न्याय देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.

Tags

follow us