केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी थेट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसीला देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यामध्ये आता आठवलेंनी उडी घेतली आहे. त्या्ंनी भुजबळांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
आठवले म्हणाले की, छगन भुजबळ यांची भूमिका रास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी हे मराठा समाजाचे आहे. छगन भुजबळ हे शरद पवारांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहिले. पण जर भुजबळांना अन्याय झाल्याचे वाटत असेल तर छगन भुजबळ यांनी बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावे, असे आठवले म्हणाले.
हिंमत असेल औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण काढा; इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
यावेळी त्यांनी विरोधी पक्षातीन नेत्यांच्या बैठकीवर देखील भाष्य केले. विरोधी पक्षांना माझ्या शुभेच्छा असून त्यांनी एकत्र यावे, असे आठवले म्हणाले. तसेच नरेंद्र मोदी हे मुस्लीम विरोधी नाही, अशी भावना तयार झाली आहे. नरेंद्र मोदी हे जगातील पॉप्युलर नेते असून विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी NDA चे सरकार येईल. 2024मध्ये आम्ही 350 पेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘अशीच नौटंकी करत राहिलात तर तेलंगणा सुद्धा’… राऊतांचा पंढरपुरात आलेल्या ‘KCR’ना इशारा
तसेच त्यांनी राज्यातील मॉब लिचिंगवर आपले मत मांडले. मला वाटतं की, याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिलेले आहेत.आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात गोमांस होते का, याची तपासणी करावी. याबाबत मी फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याचे आठवलेंनी सांगितले.