Central team visit state for drought assessment CM shares details after meeting with Amit Shah : यंदाच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तसेच शेतकरी आणि फिरण्यास नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यात आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज भेट घेतली. त्यात त्यांनी राज्याला जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी केली.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मी आज भेट घेतली. कारण केंद्रिय गृहमंत्री हे एनडीआरएफ आणि इंटर मिनिस्ट्रीअल ग्रुपचेही अध्यक्ष असतात. दुष्काळाच्या आणि मदतीच्या संदर्भातील प्रस्ताव या ग्रुपकडे जातात. त्याचे अध्यक्ष अमित शाह आहेत. त्यामुळे मी महाराष्ट्राचा आगाऊ प्रस्ताव पाठवला. त्याची कल्पना देण्यासाठी मी त्यांना भेटलो.
आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्रातील दुष्काळाच्या स्थितीवर विस्तृत चर्चा केली, संपूर्ण परिस्थिती सांगत राज्य सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली. एक निवेदन सुद्धा राज्य सरकारच्या वतीने दिले.
महाराष्ट्रात 265 पेक्षा अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळी उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत एनडीआरएफच्या वतीने अधिकाधिक मदत देण्यात यावी, अशी विनंती त्यांना केली.
महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, असे आश्वासन मा. अमितभाई शाह यांनी यावेळी दिले.
केंद्र सरकारची चमू पाहणीसाठी 8 ते 11 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
केंद्र सरकार भक्कमपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहील, हे त्यांनी आश्वस्त केले, त्यासाठी मी त्यांचा अतिशय आभारी आहे.
@AmitShah @HMOIndia
#NewDelhi— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 7, 2026
त्यात मी त्यांना महराष्ट्रातील दुष्काळाची भीषण स्थिती सांगितली की, राज्यात पिण्याचे पाणी, चारा आणि इतरही समस्या आहेत. त्यावर महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत देण्यात यावी अशी मी त्यांना मागणी केली. त्यामुळे 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील दुष्काळाची पाहणी करायला केंद्रीय पथक येणार आहे. यावेळी मी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी देखील चर्चा केली.
