Chagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, ‘दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही.’ असं म्हणत त्यांनी दमानिया यांचा दावा फेटाळला आहे.
Aditya Chopra : आदित्य चोप्रा यांनी शिव रवैलवर सोपवली महत्वाची जबाबदारी
दमानिया यांचा दावा खोटा असल्याचं सांगत भुजबळ म्हणाले की, ‘मला अजून त्याबाबत काहीही माहिती नाही. त्यांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. असं काही प्रपोजल मला आलेले नाही. तसेच माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही. अजून माझ्या पक्षात कोणी माझ्याविरुद्ध काही बोलत नाही. तसेच अजित पवार देखील मी माझ्या समाजाचे काम करत असल्याने त्याला विरोध करत नाहित.’
काय म्हणाल्या होत्या दमानिया?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केल होतं. त्यामध्ये त्यांनी भुजबळ भाजपच्या वाटेवर? असा सवाल उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘भुजबळ भाजप च्या वाटेवर? एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप?’
‘बाळासाहेबांच्या आसनाची किंमत फक्त 10 हजार’; ‘एसीबी’च्या कारवाईवर साळवींचा संताप
तसेच यावेळी दमानिया यांनी भुजबळांना भाजपमध्ये घेण्याची गरज का पडली? यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, भुजबळ यांना भाजप ओबीसी चेहरा बनवणार आहेत. राज्यातच नाही तर देशभरात त्यांना प्रोजेक्ट केलं जाणार आहे. कारण भुजबळांचं मंडल आयोगाच्या लढ्यामध्ये योगदान आहे. त्यामुळे भाजपला भुजबळ हे भाजपमध्ये हवे आहेत. मात्र मनोज जरांगे यांच्याप्रमाणे एक साधा शेतकरी जर मराठा समाजाचे नेतृत्व करू शकतो. तर भुजबळ सारखा भ्रष्टाचाराचे आरोप असणारा चेहरा भाजपला का हवा आहे? असा प्रश्न मला पडलाय. तसेच भाजपा आता त्याच नेत्याला मोठं करत आहे. ज्याच्यावर एकेकाळी भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.