बीड : एकीकडे मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. ओबीसींमधून मराठा (Maratha OBC Reservation) समाजाला सरसकट आरक्षणास माझा विरोध असून, असे प्रमाणपत्र देणे बेकादेशीर आहे. अशाप्रकारे प्रमाणपत्र देणारे सत्तेतून बाहेर पडतील असा इशारा भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांचे विधान एकप्रकारे शिंदे सरकारला घराचा आहेर असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. (Chagan Bhujbal Big Statement On Maratha Reservation)
Maratha Reservation : ‘होय, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे’; बागेश्वर बाबांनी कारणही सांगितलं
एवढे हतबल पोलीस पाहिले नाही
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, बीडमधील घटना बघता पोलीस खातं एवढं हतबल झालेले कधी बघितले नाही. मी सुद्धा गृहमंत्री राहिलो आहे. मॉब सायकोलॉजीचा माझा अभ्यास आहे. दंगलीदेखील पाहिल्या आहेत. पण, बीडमध्ये घडलेल्या घटना बघता पोलीस खातं सपशेल फेल झाल्याचे म्हणत त्यांनी फडणवीसांकडे असलेल्या गृहखात्यावरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Pune News : शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळला; सिरीयातून मिळत होत्या सूचना
छगन भुजबळांच्या पोटातलं ओठावर आलं
मराठा समाज जास्त काही मागत नाही, आपल्या हक्काचं बोलत आहे. मनोज जरांगेंची भेट घेणाऱ्या माजी न्यायमूर्तींवर भुजबळांनी टीका केली होती, त्याला जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, जालन्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावर भुजबळांनी पोलिसांची बाजू घेऊन आपल्यावर टीका केली. मी तर म्हणतोय की याची सखोल चौकशी करा. तुम्ही जे बोलताय ते खरं असेल तर तुमच्या सरकारकडून चौकशी करा. जे या प्रकरणात बडतर्फ व्हायला पाहिजे होते, ते बाजूलाच राहिलेत आणि कारवाई दुसऱ्या पोलिसांवरच केली.
आता दहशत माजवावीच लागेल
आपलं दुःख असेल तर बोलायला पाहिजे. आपल्यावर अन्याय होत असेल, आपल्याला दुःख असेल तरीसुद्धा आपण गप्पा जर राहिलो तर त्याला कोणी डॉक्टर भेटणार नाही, त्याला कोणी औषध देणार नाही. त्यामुळे आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करुन घ्यायचं, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. खरोखरच कुणबीतून निजामकालीन पुरावे सापडले तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या, यासाठी आमची हरकत नव्हती. पण आधी पाच हजार, मग दहा हजार, मग झाले पंधरा हजार आणि आता महाराष्ट्रभर होत आहे.
समोरच्या दारातून प्रवेश मिळत नाही, म्हणून मागच्या दारातून ओबीसीमध्ये येण्याचा हा कार्यक्रम आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण वेगळं आरक्षण द्या, आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका. कारण आमच्या जवळजवळ 375 जाती आणि 54 टक्क्यांपेक्षा जास्त लोक आहेत. त्यांच्या आरक्षणावर गदा येईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने साखळी उपोषण, उपोषण या माध्यमातून एकत्र या आणि या गोष्टीला विरोध करा. वेगवेगळे आवाज आले तर तुमच्या लेकराबाळांचं भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे एकत्र रहा आणि विरोध करा. यासाठी सरकार असेल तरी सरकारच्या विरोधात मी बोलायला तयार आहे, असंही भुजबळ म्हणाले होते.