Pune News : शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळला; सिरीयातून मिळत होत्या सूचना
पुणे : शहरातील विविध भागात साखळी बॉम्बस्फोट (Serial Blast) घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, अशा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. इसिसच्या मॉड्युलप्रकरणी तपासात ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी फरार दहशतवाद्याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. (Terrorist Planning To Serial Blast In Pune City)
भुजबळांना भडक वक्तव्य करण्याची सवय; अजितदादांनी वेळीच लक्ष घालावं
मध्यंतरी पुणे पोलिसांनी कोथरूड परिसरातून काही दहशतवाद्यांना अटक केली होती. यातील एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. अखेर त्याला एनआयने अटक केली असून, चौकशीदरम्यान शाहनवाज याने बॉम्ब तयार करून ते शहरातील विविध भागात ठेवून ब्लास्ट करण्याचं नियोजन करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टेस्टिंगदेखील करण्यात आल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा जगभरात बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संपर्क होता अशीही माहिती तपासातून समोर आली आहे.
कोथरूडमधून करण्यात आली होती अटक
मध्यंतरी शहरातील कोथरूड परिसरात पोलिसांनी दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकीसह शाहनवाझ आलमला पकडले होते. यावेळी शाहनवाजच्या घराची झडती घेत असताना त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्यानंतर अखेर शाहनवाजच्या मुसक्या आवण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशीदरम्यान शहरातील विविध भागात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. तसेच यासाठी या दहशतवाद्यांना सीरियातून सूचना दिल्या जात होत्या, अशी धक्कादायक माहितीदेखील चौकशीदरम्यान समोर आली आहे.
असे सापडले पोलिसांच्या जाळ्यात
पुणे पोलिसांकडून सध्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गस्त व पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. 19 जुलै 2023 रोजी कोथरूड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन यांनी वरील आरोपींना दुचाकी चोरीच्या संशयातून हटकले. मात्र, त्यांची हालचाल ही संशयास्पद दिसली. कर्मचाऱ्यांनी लागलीच मदत बोलवत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. त्या दरम्यान त्यांच्याकडे एक लॅपटॉप, चार मोबाइल तसेच बनावट आधारकार्ड मिळाले.
Pune News : शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळला; सिरीयातून मिळत होत्या सूचना
सखोल चौकशीदरम्यान काही संशयास्पद आढळून आल्याने त्यामुळे पुणे एटीएसला माहिती देण्यात आली. या दोघांकडे चौकशी केल्यानंतर ते NIA कडून फरार असलेले दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. चौकशीवेळी राजस्थान चितोडगड याठिकाणी NIA एक कारवाई केली होती. तेव्हा काही स्फोटक पकडले गेले होते. त्या गुन्ह्यात वरील आरोपी फरार असल्याचे तसेच NIA कडून या आरोपींवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे समोर आले होते.