Download App

Maharashtra Weather Update : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता, बळीराजाचं टेन्शन वाढलं !

मुंबई : दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात सध्या फेब्रुवारी महिना सुरू असताना देखील तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे एकीकडे उष्णता आणि आता त्यात पावसाची भर पडली आहे. 4 आणि 6 मार्चला हवामान विभागाने (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. होळीच्या सणामध्ये राज्यात काही ठिकाणी आता पावसाचं संकट येण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर मार्च आणि मो महिन्यात कडाक्याचे ऊन पडेल. असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला होता. त्यातच आता हवामान विभागाने (IMD)पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता उन्हाळा सुरू होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या संदर्भात अंदाज हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर माहिती दिली आहे.

दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण गहू, हरभरा, तुरी यांसारख्या पिकांची काढणी सुरू आहे. तर काही ठिकाणी ही पीक अजूनही शेतात उभी आहेत. त्यांना या पावसामुळे धोका निर्माण होणार आहे. अगोदरच याच पिकांना अवकाळी पावसाचाही फटका बसला होता. तर आता या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.

राज्यात उन्हाच्या चटका कमी होणार…तीन दिवस पावसाची शक्यता

दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. परिणामी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 5 मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. तर विदर्भात 6 मार्चला सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकणात सुद्धा पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात सुद्धा कमाल तापमानात सरासरीपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

Tags

follow us