राज्यात उन्हाच्या चटका कमी होणार…तीन दिवस पावसाची शक्यता
मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये 4 ते 6 मार्च दरम्यान पावसाची (Rain)शक्यता वर्तवली आहे. मार्च ते मे महिन्यात (March To May) कडाक्याचं उन पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं (Department of Meteorology)वर्तवला होता. त्यातच आता हवामान विभागानं राज्यात तीन दिवस पावसाची (Rain)शक्यता वर्तवलीय.
गत काही वर्षात तापमानात होणारी वाढ हा चिंतेचा विषय बनलाय. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशीजवळ पोहोचला होता. त्यामुळं यंदा उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला होता. पण उन्हाळा सुरु होण्याआधीच पावसाची शक्यता आहे. आज हवामान विभागानं महाराष्ट्रात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवलीय.
मी नवाब मलिकांना देशद्रोही म्हटलं, ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवलाय.
विदर्भात 6 मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर 5 मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता कायम आहे. पण अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आलाय. औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवलीय.