Download App

Balu Dhanorkar : लोक हिणवत पण… धानोरकरांच्या पत्नीने सांगितलेला ‘तो’ भावूक करणारा किस्सा

MP Balu Dhanorkars Wife shared memory : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मेदांता रुग्णालयात त्यांनी वयाच्या 47 वर्षीं अखेरचा श्वास घेतला.

Nashik Accident : लग्नावरून परतणारी कार पुलावरून कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी

बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दाला सुरुवात केली. मात्र नंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2019 ला जेव्हा राज्यात कॉंग्रेसचा झाडून पराभव झाला त्यावेळी ते निवडून आले आणि कॉंग्रेसचे एकमेव खासदार ठरले त्यांचा खडतर असा राजकीय प्रवासाच्या आठवणी सांगितल्या जात आहेत.

Balu Dhanorkar : तिकीट नाकारलं ते कॉंग्रेसचे एकमेव खासदार असा होता धानोरकरांचा प्रवास…

शिक्षण पूर्ण केल्यानंतर कपड्यांचे दुकान सुरू केलं होतं. त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी देखील त्यांनी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी भद्रवतीमध्ये मद्यविक्रीचा व्यवसाय त्यांनी केला. त्यांच्यावर अनेक गुन्हा दाखल होते. त्यामुळे त्यांना दोनवेळा तडीपार देखील करण्यात आले होते. तर कालांतराने याच भद्रावतीमधून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. तर कॉंग्रेसमध्ये याच मद्याविक्रीचा व्यावसाय त्यांना निवडणुकीचं तिकीट नाकरण्यास कारणीभूतही ठरलं होतं.

Balu Dhanorkar : धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी – अशोक चव्हाण

धानोरकर हे आक्रमक, धोका पत्करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा तडीपार असतानाचा एक असाच थरारक किस्सा त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी सांगितला होता. प्रतिभा या देखील वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या सांगतात की, ‘जेव्हा त्यांना तडीपार करण्यात आले होते. त्या काळात लोक मला माझे पती तडीपार आहेत यावरून हिणवत. ‘तुम्हारा आदमी तडीपार है’असं ऐकवलं जात. तर पतीची भेट घेण्यासाठी मला आणि माझ्या मुलांना बाहेरगावी जावे लागत. धानोरकरांबद्दलची अशी एक भावूक आठवण प्रतिभा सांगतात.

काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं आजारपणाने निधन

दरम्यान 27 मे रोजी धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खासदार धानोरकर उपस्थित नव्हते. त्यांच्यावर मागील दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना तातडीने दिल्ली येथे नेण्यात आले. अख्रेर त्यांची प्राणज्येत मालवली.

Tags

follow us