Balu Dhanorkar : धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी – अशोक चव्हाण

Balu Dhanorkar : धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी – अशोक चव्हाण

Ashok Chavhan On MP Balu Dhanorkar Passed Away : काँग्रेस पक्षाचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचं आजारपणाने निधन झालं. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तत्काळ विशेष हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीला नेण्यात आले होते. तेथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

27 मे रोजी धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खासदार धानोरकर उपस्थित नव्हते. त्यांच्यावर मागील दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. धानोरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आतड्यांतील इन्फेक्शनमुळे त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आज मात्र त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना तातडीने दिल्ली येथे नेण्यात आले.

काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं आजारपणाने निधन

त्यांच्या निधनावर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले की, ‘काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे.

धोनीची चेन्नईच ‘किंग’, पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद, जडेजा ठरला विजयाचा हिरो !

खा. बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहर्‍यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहिल. खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’ अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

Nashik Crime : मुलीचं अपहरण करणाऱ्याच्या घराबाहेरच आई-वडिलांवर अंत्यसंस्कार

बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाने चंद्रपूरवर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव आज चंद्रपुरात आणण्यात येणार असून, वरोरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. धानोरकर हे ४८ वर्षांचे होते. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले मानस व पार्थ असा परिवार आहे.

शिवसेना ते काँग्रेस असा राजकीय प्रवास

बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दाला सुरुवात केली. शाखाप्रमुख,तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी शिवसेनेत अनेक वर्ष काम केले. २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर ते वरोरा मतदारसंघातून आमदार झाले. त्यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर ते लोकसभा निवडणूक लढले. त्यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube