Nashik Accident : लग्नावरून परतणारी कार पुलावरून कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी
Nasgik Nandgaon Accident : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये 4 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला. तर जखमींवर मालेगावमधील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या इको कारमध्ये असलेले प्रवासी जालना जिल्ह्यातून लग्नसोहळा आटोपून मालेगावकडे परतत असताना हा अपघात झाला. या कारमध्ये 10 जण होते. नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील नाग्या-साक्या धरणासमोरील कठडे नसलेल्या पुलावरून इको कार खाली नदीत कोसळली आणि अपघात झाला.
गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना दिलासा
या अपघाताची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी तातडीनं मदत कार्य करत जखमींना रूग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण रूग्णालयीत उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर मालेगाव येमालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या अपघातातील मयतांची नावे डॉ.याकूब मन्सूरी रमजान ( ४४), अफरोज अब्दुल लतिफ मन्सूरी (३७), शिफा वसीम मन्सूरी (४) अशी आहेत. तर जखमींमध्ये नजमा याकूब मन्सूरी (४५), आयान याकूब मन्सूरी (२५), अबुजर याकूब मन्सूरी (२५) सारा वसीम मन्सूरी (3) सुमैय्या वसीम मन्सूरी, वसीम अब्दुल लतिफ मन्सूरी ( 35), मिस्बाह याकूब मन्सूरी (30). यांचा समावेश आहे.
Balu Dhanorkar : तिकीट नाकारलं ते कॉंग्रेसचे एकमेव खासदार असा होता धानोरकरांचा प्रवास…
रात्री उशीराने हे प्रवासी जालनावरून लग्नावरून परतत होते हा प्रवासाचा मोठा टप्पा पार केल्याने चालकाला झोप लागली असावी. त्यामुळे हा अपघात झाला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.