Memories Of IPL 2023 : ‘थाला’च्या पोरांनी मनं अन् ट्रॉफी दोन्ही जिंकलं; अरजीतचं पाया पडणं ते कोहली-गंभीर भिडणं
Memories Of IPL 2023 : तितटीच्या सामन्यात धोनीच्या संघाने गुजरात टायटन्सचा पराभाव करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नई संघाच्या पोरांनी करून दाखवलं हे या विजयानंतर बोललं जात आहे. आयपीलचा यंदाचा सीझन काही ना काही कारणांमुळे चर्चेत आला. या मोसमात अतिशय मनोरंजक सामने खेळले गेले. या सीझनमध्ये 59 दिवसांत अनेक खास क्षण पाहायला मिळाले. बॉलीवूडमधील दिग्गज अरिजित सिंगने उद्घाटन समारंभात महेंद्रसिंग धोनीच्या पाया पडण्यापासून स्पर्धेला धमाकेदार सुरुवात झाली. यानंतर आणखी अनेक खास क्षण पाहायला मिळाले.
1. अरजीतचे पाया पडणे
एमएस धोनी जगातील सर्वात प्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. स्टार गायक अरिजित सिंगदेखील धोनीचा जबरदस्त चाहता आहे. 31 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या उद्घाटन समारंभात दोघांनी एक भावनिक क्षण शेअर केला. या सोहळ्याचे समोर आलेल्या फोटोंमध्ये अरिजित धोनीच्या पायाला स्पर्श करताना दिसून आला.
2. कोहली-गंभीर आणि नवीन मैदानावर भिडले
एकीकडे अरजीतने धोनीच्या पाया पडणे हा भावनिक क्षण सर्वांनी अनुभवला. याची चर्चादेखील झाली. तर, दुसरीकडे खचाखच भरलेल्या मैदानात प्रेक्षकांसमोर कोहली, गंभीर आणि नवीन उल हक एकमेकांसोबत भिडल्याचेही पाहिला मिळाले. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामन्यात हा प्रकार घडला. यावेळी बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोहली आणि अमित मिश्रा यांच्यातही वाद झाला.
CSK vs GT Final : जेतेपदासाठी गुरू-शिष्य भिडणार; जाणून घ्या, हेड टू हेड संभाव्य प्लेइंग इलेव्हन
3. धोनीने दिला गावस्कर यांना ऑटोग्राफ
IPL 2023 मध्ये, चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात 14 मे रोजी एक मनोरंजक सामना खेळला गेला. कोलकाताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. सामन्यानंतर जे घडले ते पाहून चाहते भावूक झाले. वास्तविक, सामना संपल्यानंतर चेन्नईचे खेळाडू चाहत्यांचे आभार मानण्यासाठी चेन्नई स्टेडियममध्ये फिरत होते. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर कर्णधार धोनीकडे धावले आणि त्यांनी शर्टवर ऑटोग्राफची मागणी केली. यानंतर धोनीने हसत हसत गावस्कर यांच्या शर्टवर ऑटोग्राफ दिला. हा क्षण पाहून चेपॉक स्टेडियमवर उपस्थित असलेले चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स भावूक झाले.
4. अर्शदीपने सलग दोन चेंडूंमध्ये दोन स्टंप तोडले
IPL 2023 मध्ये, 22 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने घातक गोलंदाजी करताना चार बळी घेतले. केवळ बळी न घेता अर्शदीपने दोन्ही वेळेस मधला यष्टी मोडला. अशा स्थितीत पंचांना दोन्ही वेळा नवीन स्टंप बसवावे लागले. पंजाबने हा सामना 13 धावांनी जिंकला.
5. प्रथमच दोन अनकॅप्ड खेळाडूंनी ठोकले शतक
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मोसमात दोन अनकॅप्ड खेळाडूंनी शतक केले. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जैस्वाल आणि पंजाब किंग्जचा प्रभसिमरन सिंग यांचा समावेश आहे. यशस्वीने मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएल 2023 च्या 42 व्या सामन्यात 62 चेंडूत 124 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि आठ षटकार मारले. मात्र, राजस्थानचा संघ हा सामना हरला. यशस्वीची बॅट इथेच थांबली नाही. त्याने 11 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध IPL इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला. त्याने 13 चेंडूत अर्धशतक केले आणि केएल राहुलचा 14 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम मोडला.
त्याच वेळी, आयपीएल 2023 च्या 59 व्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 31 धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाबचा हिरो होता प्रभसिमरन सिंग, ज्याने १०३ धावांची शानदार शतकी खेळी केली. IPL इतिहासात शतक झळकावणारा प्रभसिमरन सिंग हा सातवा अनकॅप्ड खेळाडू ठरला. यापूर्वी हा पराक्रम शॉन मार्श, मनीष पांडे, पॉल वल्थाटी, रजत पाटीदार, यशस्वी जैस्वाल यांनी केला आहे. यशस्वीने या मोसमात 14 सामन्यांत 625 धावा केल्या.
Video : या’ कारणांमुळे पेटला जेजुरी गडाच्या विश्वस्तपदाचा वाद