Video: धोनीची चपळाई बघा, 0.12 सेकंदात गिलचा खेळ खल्लास !

  • Written By: Published:
Video: धोनीची चपळाई बघा, 0.12 सेकंदात गिलचा खेळ खल्लास !

IPL 2023 Final: अहमदाबाद येथील मैदानावर चेन्नई व गुजरातमध्ये आयपीएलची फायनल सुरू आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरातने 214 धावांचा डोंगर उभा केलाय. या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत असलेल्या शुभमन गिलची चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतलेली स्टॅम्पिंगची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वयाची चाळीशी पार केलेला धोनी या वयात चपळाईने खेळत असल्याचे या स्टम्पिंगवरून दिसून येत आहे.

साई सुदर्शनची धुवांधार बॅटींग, सीएसकेसमोर 215 धावांचा डोंगर

धोनीने टॉस जिंकल्यावर गुजरातला फलंदाजीला आमंत्रित केले. सलामीवीर शुभमन गिल आणि वृद्धीमान साहाने चांगली सुरुवात केली. गिल हा चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करत होता. गिलने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता. गिलला लवकर तंबूत पाठविण्यासाठी धोनीने रविंद्र जडेजाला गोलंदाजीला बोलविले. सातव्या ओव्हरच्या शेवटचा चेंडूवर जडेजाने गिलला चकवले. तर धोनीने डोळ्याच्या पापण्या लवत नाही तेच स्टॅम्प उडवून गिलची विकेट घेतली. अवघ्या 0.12 सेकंदात धोनीने स्टॅम्प उडविल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. गिलने वीस चेंडूंत 39 धावांची खेळी केली. त्यात त्याने सात चौकार मारले आहे.

IPL च्या या हंगामात गोलंदाजांनी टाकले 100 पेक्षा जास्त नो बॉल

धोनी वयाच्या ४१ व्या वर्षीही जबरदस्त विकेटकिपिंग करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने 20 ओव्हरमध्ये चार विकेटच्या बदल्यात 214 धावांचा डोंगर उभा केला आहे. सलामीवीर वृद्धीमान साहा याने 54 धावांची खेळी केली आहे. चेन्नईकडून मथिशा पथीरानाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान आहे. चेन्नईची फलंदाजी सुरू झाली. पण तीन चेंडूनंतर पुन्हा पावसाची आगमन झाले. त्यामुळे खेळ थांबला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube