Download App

सिगारेट दिली नाही म्हणून संतापला… धारदार शस्त्राने केली महिलेची हत्या, अल्पवयीन तरूणाचा प्रताप

Minor Youth Killed Woman For Not Giving Cigarette : चंद्रपुरमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली (Chandrapur Crime News) आहे. उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या केली. रमाबाई नगरमध्ये येथे ही घटना घडली (Minor Youth Killed Woman) आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कविता रायपुरे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. आरोपीची जवळपास एक हजार रूपये उधारी असल्याने मयत महिलेने आधीची उधारी दिल्याशिवाय सिगारेट (Cigarette) देण्यास नकार दिला होता, त्यामुळे संतापाच्या भरात या अल्पवयीन मुलाने महिलेला संपवल्याचं समोर आलंय.

धारदार शस्त्राने हत्या

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून महिलेचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. धक्कादायक म्हणजे खून करणारा  (Chandrapur News) आरोपी हा त्याच परिसरात राहणारा 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे. राजुरा शहरातील रमाबाई नगर येथे कविता रायपूरे (55 वर्षीय) घरी एकटी असतानाच आरोपीने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. ही घटना 15 जून रोजी घडली.

Prajakta Gaikwad : पिवळ्या रंगाच्य साडीत नटली प्राजक्ता, चाहत्यांचे वेधले लक्ष…

40 ते 50 लोकांची चौकशी

घटना घडली तेव्हा कविता रायपूरे यांचा मुलगा कामावर गेला होता. घरी त्या एकट्याच होत्या. घराच्या शेजारील राहणारी त्यांची विवाहित मुलगी सकाळी जेव्हा त्यांच्या (Crime News) घरी आली तेव्हा ही घटना उघडकीस आल्याचं कळतंय. पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 40 ते 50 लोकांची चौकशी केल्याचं समजतंय. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की, मृत महिलेच्या घराजवळील एक तरूण बाहेरगावी गेलाय. संशयाच्या आधारावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली.

डोक्यात कोयत्याने वार केले अन्

चौकशीमध्ये धक्कादायक खुलासा झाला. मृत कविता रायपुरे यांच्या घरी एक छोटंसं किराणा दुकान आहे. आरोपीची जवळपास एक हजार रूपये उधारी होती. मृत महिलेने आधीची उधारी दिल्याशिवाय सिगारेट देणार नाही, असं त्यांनी सांगितलं. याच रागातून आरोपीने पहाटेच्या सुमारास कविता यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले अन् त्यांचा खून केला. धक्कादायक म्हणजे हत्या करण्यासाठी आरोपीने अत्यंत शांतपणे योजना आखल्याचं कळतंय.

SEBI : सेबी’चा नवा गुंतवणूक पर्याय; पारंपरिक म्युच्युअल फंडापेक्षा जास्त लवचिकता

इंटरनेट वरून माहिती

अल्पवयीन आरोपीने इंटरनेट वरून माहिती गोळा केली. अल्पवयीन असल्याने आपल्याला फार शिक्षा होणार नाही, याची माहिती मिळवली होती. पळून जाण्यासाठी हुबळीच्या प्रवासाचा बेत आखत तिकिटं काढून ठेवली. स्वतःच्या मोबाईलमधून ब्राऊजिंग हिस्ट्री डिलीट करत थंड डोक्याने खून केला आणि हुबळीला निघून गेला, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. पोलिसांनी त्याला बालसुधार गृहात पाठवलं आहे.

 

follow us