Download App

आदित्य ठाकरेंची लायकी काय? बावनकुळेंची ठाकरे पिता-पुत्रावर आक्रमक टीका

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule : सुमारे 25 वर्ष ज्यांची नैसर्गिक युती होती त्या भाजप आणि शिवसेना (उबाठा)मधून सध्या वि स्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. 2019 ला अनपेक्षितपणे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केलं आणि तेव्हापासून कुणी कुणाला फसवलं याचे जोरदार वार प्रतिवार सुरू झालेत ते आणखीही सुरूच आहेत. नुकतंच (Uddhav Thackeray ) उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काय ठरलं होत (Devendra Fadnavis) याबद्दल एक नवा दावा केला. तर, त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्वच नेते जोरदार पलटवार करत आहे. आता तर भापज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे युवा सेनाप्रमुख (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे यांची लायकी काढण्यापर्यंत बोलले आहेत.

 

पहिलं काम मुलाला मंत्री बनवलं

उद्धव ठाकरे ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना पुत्रप्रेम जास्त आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायच आहे. मात्र, हे वाक्य देवेंद्र फडणवीस बोलले असं म्हणून ते गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, खर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम काय केलं तर ते आदित्य ठाकरे यांना मंत्री बनवायचं काम केलं. असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

 

उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती चांगली नाही

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, आदित्य ठाकरेंची लायकी काय? आदित्य ठाकरे हे हवेत निवडून आले आहेत असा थेट घणाघात बावनकुळे यांनी यावेळी केला आहे. तसंच, आदित्य ठाकरे आमदार झाल्यानंतर कुणाचं आधार कार्ड काढलं का? कुणाची काही काम केली का? असा प्रश्न उपस्थित करून बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरीह प्रहार केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. तसंच, त्यांच्या कोणी सभा घ्यायलाही तयार नाही अशी टीकाही बावनकुळे यांनी यावेळी केली आहे.

 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

2019 ला झालेल्या विधानसाभा निवडणुकीपूर्वी अमित शाहांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. त्याचवेळी आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करुन मी दिल्लीत जाणार असं स्वत: फडणवीस म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. तसंच, मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार. पंरतु, भाजपनं मलाच माझ्या लोकांसमोर खोटं पाडलं असंही ठाकरे म्हणाले होते.

follow us