Download App

Chandrashekhar Bawankule : ‘महायुतीला विधानसभेत 200+ अन् लोकसभेत 45+ जागा मिळणार’

Chandrashekhar Bawankule : राज्यातील सर्वच पक्षांना आता आगामी निवडणुकांचं वेध लागलं असून निवडणुकीच्या घोषणेआधीच नेत्यांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलून दाखवलं आहे. नागपुरमधील कोराडी इथं बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बावनकुळेंच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत असल्याचं दिसून येत आहे.

बावनकुळे म्हणाले, राज्यात विधानसभेत 200+ जागा आणि लोकसभेत 45+ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत. या उमेदवारांमध्ये नवीन लोकं येणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे हा आकडा दिसणारच आहे. आगामी निवडणुकीनंतर निकालात स्पष्ट होणार असल्याचा विश्वासही बावनकुळेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

सीबीआयची मोठी कारवाई, GST अधिक्षकाला लाच घेतांना अटक, 43 लाखांची रोकड जप्त

तसेच पुढे बोलताना बावनकुळेंनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत.

नागपूरकरांना गुडन्यूज! सीएनजीच्या दरात मोठी घसरण; आता ‘इतक्या’ रुपयांत मिळतंय इंधन

महाराष्ट्राच्या मंत्रिपदाच्या जागा ते लवकरच भरतील, अशी अपेक्षा आहे. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे नागपुर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, अशी विनंती करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Tags

follow us