सीबीआयची मोठी कारवाई, GST अधिक्षकाला लाच घेतांना अटक, 43 लाखांची रोकड जप्त

सीबीआयची मोठी कारवाई, GST अधिक्षकाला लाच घेतांना अटक, 43 लाखांची रोकड जप्त

मुंबई : नोकरशाहीत बोकाळलेल्या भ्रष्टारामुळं लाच घेण्याचं प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरांवर सातत्याने कारवाया केल्या जातात. मात्र, लाच घेण्याचे प्रकार काही कमी होतांना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका तहसिलदारा लाच घेतांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर आताही लाच स्वीकारल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एका जीएसटी अधिकाऱ्याला लाच (bribe) घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एवढेच नाही तर यावेळी सीबीआयने 43 लाख रुपयांची रोकडही जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने जीएसटीच्या एका अधीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच ठिकाणी तपासादरम्यान पथकाला 42.70 लाखांची रोकड सापडली. हेमंत कुमार असं अटक करण्यात आलेल्या जीएसटी अधिकाऱ्याचे नाव असून तो सीजीएसटीच्या भिवंडी आयुक्तालयात अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चांद्रयान-3 च्या कॅमेऱ्याने टिपले चंद्राचे अदभूत फोटो, इस्रोने शेअर केला व्हिडिओ 

फियादीने सांगितल्यानुसार, कंपनीचे प्रलंबित जीएसटी प्रकरण निकाली काढण्यासाठी 30 लाख रुपयांची अवाजवी मागणी केल्याबद्दल CGST अधीक्षक हेमंत कुमार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर आरोपींनी 15 लाख रुपयांची लाचेची बोलणी केली. याच लाचेचा पहिला हप्ता घेताना या जीएसटी अधिकाऱ्याला सीबीआयने रंगेहाथ अटक केली.

सीबीआयने सापळा रचून आरोपी हेमंत कुमार याला लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर आरोपींच्या गाझियाबाद, मुंबई येथील कार्यालय आणि निवासस्थानावर झडती घेण्यात आली आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर गुन्हेगारी कागदपत्रांसह 42.70 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायाधीशासमोर हजर केले असता त्याला २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube