Chandrashekhar Bavankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule ) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. बावनकुळे म्हणाले की, विरोधकांनी एकत्र येऊन कितीही मोठी आवळल्या तरी जनता ईव्हीएमवर कमळाचे बटन दाबून त्यांना 440 होल्टचा करंट लागणार आहे. बावनकुळे हे महाविजय-2024 या अभियानांतर्गत म्हाडा लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी बोलत होते.
जनता विरोधकांना 440 व्होल्टचा करंट लावणार…
यावेळी बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांना तडे दिले, यामुळे तर पंतप्रधान मोदी हेच सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात हा विश्वास असल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपासोबत आले आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. दोन्ही नेते विचार व विकासासाठी एकत्र आले आहेत.
भुजबळांच्या समान जागा वाटपाची हवा तटकरेंनीच काढली, म्हणाले आमचा अंतिम निर्णय…
पुढे ते म्हणाले की, महाविकास आघाडी काळात महाराष्ट्र थांबला होता. उद्धव ठाकरे यांचे सरकार अडीच वर्षे फेसबुक लाईव्हवर होते. थांबलेला महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात गतिमान करण्यासाठी एकनाथ शिंदे सोबत आले, तर अजित पवारांनी मोदीजींच्या सर्वोत्तम भारताच्या संकल्पाला साथ दिली आहे. विरोधकांनी एकत्र येऊन कितीही मुठी आवळल्या तरी जनता ईव्हीएमवर कमळाचे बटन दाबून त्यांना 440 व्होल्टचा करंट लावणार आहे.
SA vs IND : पहिल्याच दिवशी रबाडाने भारताची दाणादाण उडविली; केएलने एकतर्फी खिंड लढविली !
यावेळी त्यांच्या या मेळाव्यात खासदार रणजित नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आ.राम सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र भाजपा विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी आणि कार्येकर्ते या मेळाव्यामध्ये उपस्थित होते.