SA vs IND : पहिल्याच दिवशी रबाडाने भारताची दाणादाण उडविली; केएलने एकतर्फी खिंड लढविली !
South Africa vs India- सेंच्युरियन : बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस (Boxing Day Test) दक्षिण आफ्रिकेचा अनुभव गोलंदाज कागिसो (Kagiso Rabada) रबाडा याने गाजविला. त्याने पाच फलंदाज करत भारताला बॅकफूटवर नेले. पण के. एल. राहुल (KL Rahul) याने झुंजार खेळी करत अर्धशतक झळकविले आहे. ते 70 धावांवर खेळत आहे. दिवसअखेर भारत आठ बाद 208 धावा करू शकला आहे. तिसरे सत्र हे रबाडाच्या नावावर राहिले आहे. त्याने या सत्राच तब्बल चार फलंदाजांना बाद केले. पावसामुळे पहिल्या दिवशी 59 षटकांचा खेळ होऊ शकला.
Shirur Loksabha अजितदादांकडे गेल्यास आढळरावही अजितदादांच्या गटात जाणार? म्हणाले चर्चेला अजून…
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बावुमाने नाणेफक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय आफ्रिकेच्या गोलंदाजांनी योग्य ठरविला. पहिल्या तासात भारताचे तीनही अव्वल फलंदाज एकामागून एक तंबूत परतले. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या पाच, यशस्वी जैस्वाल सतरा धावांवर तंबूत परतला. शुभमल गिलही दोन धावांवर बाद झाला. रोहितला रबाडाने नांद्रे बर्गरकरवी झेलबाद केले. तर नांद्रे बर्गरने जैस्वाल आणि गिलला तंबूत परतले. परंतु आफ्रिकेचे क्षेत्ररक्षणही खराब झाले. श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीला एक-एक जीवनदान मिळाले. दोन्ही फलंदाजांनी त्याचा फायदा उठवत फटकेबाजी केली. जेवणापर्यंत विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या जोडीने 67 धावांची भागिदारी केली.
कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच; विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला
परंतु दुसऱ्या सत्रात रबाडासमोर भारतीय फलंदाजही चाचपडत खेळले. दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात रबाडाने अय्यरचा त्रिफळा उडविला. अय्यर 31 आणि त्यानंतर विराट कोहलीही 38 धावांवर बाद झाला. रबाडाच्या आत-बाहेर येणाऱ्या चेंडूवर विराट कोहलीला चकवा बसला. तो झेलबाद झाला. 107 धावांवर भारताचा अर्धसंघ तंबूत परतला होता. रवीचंद्रन अश्विनही आठ धावांवर बाद झाला. तर शादुल ठाकूरनेही 24 धावांवर तंबूचा रस्ता धरला. याचबरोबर रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये चौदाव्यांदा पाच बळी घेतले आहे. तिसऱ्या सत्रात ही जसप्रीत बुमराहही एका धावेवर बाद झाला. एका बाजूने गडी तंबूत परतत असताना केएल राहुल एका बाजून खिंड लढवत आहे. सहाव्या क्रमांकाला फलंदाजीला आलेल्या राहुलने संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली आहे.
भारताच्या एका, तर आफ्रिकेच्या दोघांचे पदार्पण
रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात तो खेळत नाही. अश्विनकडे फिरकीची जबाबदारी असणार आहे. तर भारताकडून वेगवान गोलंदाज कृष्णाने पदार्पण केले आहे. आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज नांद्रे बर्ग आणि फलंदाज डेविड बेडिंघम यांचे पदार्पण झाले आहे.