भुजबळांच्या समान जागा वाटपाची हवा तटकरेंनीच काढली, म्हणाले आमचा अंतिम निर्णय…

भुजबळांच्या समान जागा वाटपाची हवा तटकरेंनीच काढली, म्हणाले आमचा अंतिम निर्णय…

Sunil Tatkare : जेवढे आमदार शिंदे गटाचे आहेत, तेवढेच आमदार आमचेही आहेत. त्यामुळे जागा वाटपामध्ये त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणत समसमान जागा वाटप व्हावे अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी मांडली होती. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले की समसमान जागा वाटप होईल असं काही नाही. आमचं सर्वांच उद्दिष्ट 45+ आहे. लोकसभेच्या जागा वाटपासंबंधीचा अंतिम निर्णय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्याशी चर्चेनंतर होईल.

लोकसभा निवडणुकीबाबत आमच्यात एकच चर्चा झाली की पूर्ण ताकदीने महायुतीच्या माध्यामातून निवडणुका लढवायच्या आहेत. आम्ही वरिष्ठ नेते पुन्हा एकत्र बसून चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमचे नेते चर्चा करणार आहेत. अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

मोठी बातमी; नवाब मलिक अचानक अजितदादांच्या भेटीला, ‘देवगिरी’वर खलबतं

महायुती म्हणून आम्ही लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवणार आहोत. शक्य झालं तर जानेवारी महिन्यापासूनच तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या एकत्र सभा होतील. समन्वय समितीची नागपूरला बैठक झाली होती, त्यावेळी देखील आम्ही यावर चर्चा केली होती. त्यानुसारच आम्ही रणनीती ठरवणार आहोत, असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Shirur Loksabha अजितदादांकडे गेल्यास आढळरावही अजितदादांच्या गटात जाणार? म्हणाले चर्चेला अजून…

अजित पवार गटाच्या बैठकीवेळी आमदार नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पोहचले होते. त्यांच्यासोबत कोणती चर्चा झाली का? यावर तटकरे म्हणाले की नवाब मलिक ते त्यांच्या मतदार संघाच्या संदर्भात प्रश्न घेऊन आले होते. त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube