Download App

Chandrashekhar Bawankule :येत्या काळात भाजपमध्ये मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार…

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागलेला असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवा सस्पेन्स निर्माण केला आहे. त्यांनी सध्या मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश आश्चर्यचकित करणारे असतील असे म्हंटले आहे ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

प्रत्येक मंगळवारी भाजप पक्षात प्रवेश ठरला आहे. याही मंगळवारी एका मोठ्या नेत्याचा पक्ष प्रवेश होणार आहे. मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश आश्चर्यचकित करणारे असतील. पण आता सध्या माझ्यासमोरचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Jitendra Awhad : आप्पासाहेब धर्माधिकारींचं नाव बदनाम करु नका…

तसेच अजित पवार यांच्या पक्षप्रेवेशाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले आम्ही असं काही करत नाहीत. अजित पवार यांनी भाजपला कुठलाही संपर्क केला नाही तसेच अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या महाविकास आघाडीमधील नेतेच पसरवत आहेत. आम्ही अशा प्रकारच्या बातम्या आम्ही पसरवत नाहीत. कपोलकल्पित बातम्या चालविण्यात आलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष मागे पडला आहे. अशा प्रकारच्या बातम्या पण त्या निर्माण करण्यात आल्या आहेत. आमचे कार्यकर्ते चांगलं काम करत आहेत.

Mahesh Tapase : संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाबाबत बोलताना बावनकुळे म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार मधील लोक सगळे त्या घटनाकडे लक्ष ठेवून आहे. हॉस्पिटलमध्ये सगळी व्यवस्था गिरीश महाजन आणि सावंत यांच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे लक्ष ठेवुन आहेत. विरोधकांना आरोप करायला काही लागत नाही. विरोधकांनी उगाच राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Tags

follow us