Chandrashekhar Bawankule : देशभरात स्वामित्व योजनेचा (Swamitva Yojana) 27 तारखेला शुभारंभ होणार आहे. या योजनेद्वारे नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड (Property Card) दिले जाणार आहे. राज्यातील 30 जिल्ह्यांतील सुमारे 30 हजार 515 गावातील नागिराकंना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येतील, अशी माहिती माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) दिली.
मुख्यमंत्र्यांनी आरोपींना तात्काळ अटक करावी, सूर्यवंशी हत्या प्रकरणी मनोज जरांगे आक्रमक
चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, 27 तारखेला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान मोदी स्वामित्व योजनेा शुभारंभ करणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातही यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमात महायुतीचे मंत्री सहभागी होणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी हे कार्यक्रम डिजिटल पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जातील, अशी माहिती बावनकुळेंनी दिली.
‘ जरांगे पुन्हा आरक्षणाला बसणार…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
पुढं ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि देशभरातील सर्व मंत्री त्यांच्या जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. बऱ्यात ग्रामीण भागात जमिनीचे वाद-विवाद, मालकी हक्कावरून वाद-विवाद होतात. प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे कोणीही मालमत्तेवर कब्जा करते. फसवणूक केली जाते. मात्र, असले प्रकार होऊ नये म्हणून स्वामित्व योजना आणली. या योजनेद्वारे प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. वडिलोपार्जीत शेकडो वर्षांची घरं, जमीन याचे कार्ड प्रत्येक नागिरकांकडे असावं यासाठी ही योजना आहे. या कार्यक्रमांतर्गत वडिलोपार्जित मालकीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे, असं बावनकुळेंनी सांगितलं.
मोदींनी ड्रोनद्वारे देशाचं सर्वेक्षण केलं. महाराष्ट्रात 30 जिल्ह्यांतील 30 हजार 51 5 गावातांनी नागिराकंना या प्रॉपर्टी कार्ड, देण्यात येईल. गावपातळीवर बांधकाम परवानगी देताना प्रॉपर्टी कार्ड असल्यास इतर कशाची आवश्यकता नसेल असंही बावनकुळे म्हणाले.
मालमत्ता कर आकारण्यसाठी प्रॉपर्टी कार्ड महत्वाचे आहे. शिवाय, प्रॉपर्टी कार्ड असेल तर पुढच्या पिढीला प्रॉपर्टी मालमत्ता नावे करण्याचा मार्ग देखील सुकर होईल. गृहकर्ज घेण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड महत्वाचं ठरणार आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र मजबूत होणार आहे. हे प्रॉपर्टी कार्ड आधुनिक युगात नवीन आधार कार्ड असणार आहे. मंत्री बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण भागात ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे, आता शहरातही लवकरच सुरू होईल.