Download App

आज जाहीर होणार वाळू धोरण; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, अंमलबजावणी कधीपासून होणार?

केंद्र व राज्य शासन योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबवीत शनिवारी २० लाख घरकुल धारकांना पहिला हप्ता केंद्रीय मंत्री

  • Written By: Last Updated:

Maharashtra Sand Policy Announce Today : राज्याचे वाळू धोरण आज (दि. २४ फेब्रुवारी) रोजी जाहीर होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच दिली. उमरखेड येथे एका कार्यक्रमासाठी आले (Sand Policy) असताना ते माध्यमांशी बोलत होते. राज्य शासनाने वाळू संदर्भात अद्यापही कोणतेही धोरण जाहीर केले नसल्याने अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

Champions Trophy 2025: भारताचा पाकिस्तानवर विराट विजय; कोहलीची बॅट तळपली, जबरदस्त शतक ठोकले!

वाळू धोरणासंदर्भात उमरखेड येथे महसूलमंत्री बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यांनी शासनाचे वाळू धोरण २४ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असल्याचं सांगितलं. या धोरणाची २६ फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचीही माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

केंद्र व राज्य शासन योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबवीत शनिवारी २० लाख घरकुल धारकांना पहिला हप्ता केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात ऑनलाइन वितरित करण्यात आला. त्याच संदर्भात उमरखेड येथे महसूलमंत्री बावनकुळे आले होते. त्यांनी पंचायत समिती प्रांगणामध्ये तालुक्यातील पहिल्या हप्त्याचे प्रमाणपत्र वितरित केले.

follow us