आजच्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बदलणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर महादेवराव महाडिक यांनी दिली आहे. छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत 9 गटांपैकी 6 गटांवर महाडिक गटाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. नुकताच या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. निकालानंतर महाडिक यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
“खारघरची पुनरावृत्ती होणार नाही, याची…” बारसू रिफायनरीवरून अजित पवारांनी सरकारला सुनावलं
महादेवराव महाडिक पुढे बोलताना म्हणाले, छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत झालेला आजचा विजय सर्वसामान्य जनतेचा विजय असून आजच्या विजयामुळे कोल्हापूरचे राजकारण बदलणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. तसेच विजयामुळे कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे.
या निवडणुकीच्या विजयाचं श्रेय अमल आणि धनंजय महाडिक यांना असल्याचं महादेवराव महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे आजचा विजय प्रामाणिक सदस्यांचा असून ज्यांना शड्डू ठोकता येत नाही ते निवडणूक रिंगणात उतरले होते, अशी खोचक टीकाही त्यांनी विरोधकांवर केलीय.
Refinery Survey विरोधी आंदोलनात आणखी एकाला अटक, निषेधार्थ विविध संघटना मैदानात
दरम्यान, अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागलं होतं. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. कारखान्याच्या पहिल्या निकालात 129 पैकी महादेवराव महाडिक यांना 83 मते तर विरोधी पॅनलचे सचिन पाटलांच्या कोट्यात 44 मते पडली आहेत.
YSSharmila : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीची दबंगगिरी… थेट पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली
चुरशीच्या ठरलेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत 9 पैकी 6 गटांत महाडिक गटाने बाजी मारली आहे. तर एकूण 5 फेऱ्यांमध्ये महाडिक गटाचे 13 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. अद्याप कारखान्याचा अधिकृत निकाल जाहीर झाला नसून महाडिक गटानेच कारखान्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्याचं स्पष्ट झालंय.
निवडणुकीच्या निकालानंतर राजाराम साखर कारखान्याचा पहिला निकाल हाती येताच महाडिक गटाच्या उमेदवारांकडून विजयाचा गुलाल उधळून जल्लोष करण्यात येत आहे.