Chaturvedi Vs Shirsath : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये अद्यापही चांगलीच धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. नूकतीच उद्धव ठाकरेंनी(Udhav Thackeray) एका मुलाखतीत शिंदे गटाच्या आमदारांवर घणाघात केला होता. त्यानंतर ठाण्यात हिंदीभाषिक कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी(Priyanka Chaturvedi) यांनी शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करीत सडकून टीका केली होती. त्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ(Sanjay Shirsath) आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे.
Pune News : ‘त्या’ दहशतवाद्यांचं रत्नागिरी कनेक्शन! एटीएसकडून धक्कादायक माहिती उघड
ठाण्यातल्या कार्यक्रमात खासदार चतुर्वेदींनी चांगलीच टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता संजय शिरसाठांनीही खासदार चतुर्वेदी यांना खासदारकी कशी मिळाली? त्याबद्दल थेट भाष्य करीत जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता खासदार चतुर्वेदी यांनीही ट्विटरद्वारे शिरसाठांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नसल्याचा टोलाच चतुर्वेदी यांनी शिरसाठांना लगावला आहे.
Shivendraraje : उदयनराजेंना आता स्वत:चा पराभव दिसतोय, म्हणून पायात साप सोडण्याचे उद्योग
खासदार चतुर्वेदी ट्विटमध्ये म्हणाल्या, “मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे.” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
संजय शिरसाठ काय म्हणाले?
प्रियंका चतुर्वेदी काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी भयानक विधान केलं होतं. आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदीचं सौंदर्य पाहुन त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली, असं विधान खैरे यांनी केल्याचं संजय शिरसाठ म्हणाले होते.
दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटातीला नेत्यांमध्ये कायमच आरोप-प्रत्योरोप सुरु असतात. मात्र, यावेळी संजय शिरसाठ यांनी थेट आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. एका महिला खासदाराविषयीचं बोलणं हे शिरसाठांसाठी पहिल्यांदाच नसून ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. आता पुन्हा एकदा महिला नेत्याविषयी शिरसाठांनी विधान केल्याने ते वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.