Shivendraraje : उदयनराजेंना आता स्वत:चा पराभव दिसतोय, म्हणून पायात साप सोडण्याचे उद्योग
सातारा : साताऱ्यात नव्याने स्थापन होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेच्या वादावरून काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) आमनेसामने आले होते. त्यावेळी उदयनराजे यांनी या जागेत असणारे बाजार समितीचे कंटेनर कार्यालय पोकलेन मशीनच्या साह्याने फोडले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने उदयनराजेंच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळेच आज पहिल्यांदा बाजार समितीच्यावतीने येथे बैल बाजार भरवण्यात आला. त्याचे उद्घाटन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली. उदयनराजेंना आता स्वत:चा पराभव दिसतोय, म्हणून हे पायात साप सोडण्याचे उद्योग ते करताहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं. (Shivendraraje Bhosale on Udayanraje Bhosale over market commiti land crises)
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघेही सतत एकमेकांना लक्ष्य करत असतात. आताही शिवेंद्रराजेंनी टीका केली. ते म्हणाले, मार्केट कमिटीचा आणि मालक कुळ यांचा काही संबंध नाही. आम्हाला ही जागा शासनाने अधिग्रह करून उपलब्ध केली. त्याची रक्कम आम्ही भरली. या जागेचे मालक आणि कुळ यांनी हायकोर्ट, सुप्रीम, महसूल मंत्र्यापर्यंत सगळीकडे गेले. पण, सगळीकडचे निकाल आमच्या बाजूने लागले. भूमीपुजनाच्या दिवशीही आम्ही सांगितलं की, सगळं कायद्याने करा, उगाच दडपशाही आणि दादागिरी करून काही होणार नाही. आम्ही असल्या गोष्टींना भीक घालणार नाही, असा टोला शिवेंद्रराजे यांनी उदनयराजे यांचे नाव न घेता लगावला.
Pune News : ‘त्या’ दहशतवाद्यांचं रत्नागिरी कनेक्शन! एटीएसकडून धक्कादायक माहिती उघड
शिवेंद्रराजे म्हणाले, या जागेचे मालक हे सुप्रीम कोर्टात गेले. मात्र कोर्टाने हे प्रकरण ढिसमिस केलं. आणि मार्केट कमिटीचे अधिकार कायम ठेवले.
मध्यंतरी उदयनराजेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना माझ्यासोबत बसून चर्चा करण्यास तयार असाल तर मीही बसून चर्चा करण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. याबाबत बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. स्वतःच्या स्वार्थासाठी बसण्यात अर्थ नाही, आम्हाला कोणतीही चर्चा करायची नसल्याचं ते म्हणाले.
ते म्हणाले, नगरपालिकेत पाच वर्षाच केलेल्या भ्रष्टाचारामुळं आता त्यांना स्वत:चा पराभव दिसायला लागला आहे. त्यामुळं नगरपालिकेत कुठंतरी स्थान मिळावं, म्हणून हे पायात साप सोडण्याचे उद्योग उदनराजे करत आहेत,अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली.