Download App

भरत गोगावलेंची धास्ती; आदिती तटकरे वेटिंगवरच! रायगड अन् साताऱ्याचा तिढा कायम

मुंबई : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ आणि आदिती तटकरे यांच्याकडे अद्याप कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. (Chhagan Bhujbal and Aditi Tatkare have not yet been given the responsibility of guardian minister of any district)

सातारा, रायगडचा तिढा कायम :

आज जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत यादीनंतर सातारा, रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. पुणे, सातारा आणि रायगड या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदांची मागणी अजितदादांच्या गटाकडून करण्यात आली होती. यातील पुण्याची मागणी पूर्ण झाली आहे. मात्र साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री शंभुराज देसाई यांनी विरोध दर्शविला आहे. रायगडमध्येही शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास विरोध दर्शविली आहे. हा विरोध इतका तीव्र होता की 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी तटकरे यांना पालघरला पाठविण्यात आले होते.

बदल झालेले आणि नवे पालकमंत्री :

देवेंद्र फडणवीस – आधी नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली. आता नागपूर, गडचिरोली

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर. आता अकोला, अहमदनगर

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया. आता वर्धा, चंद्रपूर

Maharashtra : मलिन होणारी प्रतिमा सुधारा; दिल्ली दौऱ्यात शाहांनी शिंदे-फडणवीसांना झापलं

चंद्रकांत पाटील- पुणे. आता सोलापूर, अमरावती

विजयकुमार गावित – नंदुरबार. आता भंडारा

अतुल सावे – जालना, बीड. आता जालना

तानाजी सावंत- धाराशिव, परभणी. आता धारशिव

दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर. आता मुंबई शहर

गुलाबराव पाटील – जळगाव, बुलढाणा. आता जळगाव

राष्ट्रवादीकडे ‘या’ जिल्ह्यांची जबाबदारी :

अजित पवार – पुणे

अनिल भा. पाटील – नंदुरबार

धनंजय मुंडे – बीड

हसन मुश्रीफ – कोल्हापूर

दिलीप वळसे पाटील – बुलढाणा

धर्मारावबाबा आत्राम – गोंदिया

संजय बनसोडे – परभणी

Nanded Hospital Deaths : ‘दवाखान्याची परिस्थिती वाईटच’; मुश्रीफांनीच मान्य केलं ‘सरकारी आरोग्या’चं वास्तव

पालकमंत्रीपदे कायम :

गिरीश महाजन- धुळे, लातूर, नांदेड

दादा भुसे- नाशिक

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली

संदिपान भुमरे -छत्रपती संभाजीनगर

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार- हिंगोली

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

Tags

follow us