Download App

लाठीचार्ज झाल्यावर जरांगे निघून गेले, पण रोहितदादा अन् टोपेंनी पुन्हा आणून बसवलं; भुजबळांचा दावा

अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal : अंतरवली सराटीमध्ये राठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनादरम्यान मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खळबळजनक दावा केला. अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर जरांगे तेथून निघून गेल्याचा दावा भुजबळांनी केली. मात्र, रोहित पवार (Rohit Pawar) आणि राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जरांगेंना पुन्हा तिथं आणून बसवलं, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. भुजबळ यांच्या दाव्यानंतर पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

IND vs PAK Hockey: ‘चक दे इंडिया’ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा 2-1 धुव्वा  

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अंतरवली सराटीतील झालेल्या दगडफेक आणि लाठीमाराच्या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता. मात्र, रात्री 2 वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना तिथे परत आणून बसवलं. यानंतर तिकडे शरद पवारांना नेलं. आधी शरद पवार गेले, मग उद्धव ठाकरे हे देखील गेले. खरी परिस्थिती जी आहे, त्याची या दोघांनाही कल्पना नव्हती, असं भुजबळ म्हणाले.

‘खडसे भाजपमध्ये आल्यास फडाके फोडून स्वागत करू’; गिरीश महाजनांचे मोठे विधान 

पुढं ते म्हणाले, पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना इथे पोलिसांवरच मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची झाल्याची कल्पना नव्हती. आंदोलकांच्या दगडफेकीत 80 पोलिस कर्मचारी जखमी झाले. महिला पोलीस कर्मचारी दवाखान्यात दाखल झाले होते. नंतर त्यांनी अंतरवली सराटीत स्वरंक्षणसाठी लाठीमार केला, हे या नेत्यांना माहिती नाही. फक्त एकच बाजू जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जरांगेंना मिळाला, असं भुजबळ म्हणाले.

अंतरवली सराटीमध्ये घडलेल्या दगडफेकीत रोहित पवार आणि राजेश टोपेंचा वाटा आहे, असं तेथील लोकं सांगतात, असही भुजबळ म्हणाले. दरम्यान, भुजबळांच्या या आरोपांवर आता रोहित पवार आणि राजेश टोपे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us