Download App

Chhagan Bhujbal : प्रकाश शेंडगेंच्या नव्या पक्षाच्या घोषणेवर भुजबळांचा सल्ला; हा विचार ओबीसींच्या एकीमध्ये खंड…

Chhagan Bhujbal : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी नव्या पक्षाची घोषणा करणाऱ्या ओबीसी नेते प्रकाश शेंडगे ( Prakash Shendge) यांना एक सल्ला दिला आहे. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व पक्षातील नेते एकत्र येत आहेत. मात्र असा नव्या पक्षाचा विचार हा ओबीसींच्या एकीला खंड पाडणारा ठरू शकतो.

Vijay Wadettiwar : महायुतीचा दीडशे कोटींचा मोबाईल घोटाळा; वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ!

भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही ज्या काही रॅली किंवा बैठका, सभा घेत आहोत. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या सर्व पक्षातील ओबीसी नेते असतात. मात्र यामध्ये आम्ही जर नवा पक्ष काढण्याचा विचार केला, तर यामुळे वेगवेगळ्या पक्षातून एकत्र आलेले ओबीसी नेते काय करतील?

MP Blast : फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू; आजूबाजूचा परिसरही हादरला

त्यातून आणखी नवे मतप्रवाह निर्माण होतील आणि एकत्र येत असलेले ओबीसी नेते यांच्यामध्ये खंड पडेल. याचा देखील विचार करायला हवा. तसेच माझा आणि आमच्या सर्वांचं सध्या एकच लक्ष आहे. ते म्हणजे ओबीसी आरक्षण वाचवणे. तसेच ओबीसी आरक्षणावरचे हे आक्रमण थांबवण्यासाठी आम्हाला सर्व पक्षातील आम्हाला मदत करणाऱ्या आणि ओबीसी नेत्यांना सोबत घ्यायचा आहे. असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले.

तसेच यावेळी भुजबळ असे देखील म्हणाले की, लोकशाही आहे. त्यामुळे ज्याला जे हवं ते तो करू शकतो. त्याला मी विरोध करू शकत नाही. पण माझं मत असं आहे की, आज ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व पक्षातील आमदार खासदार नेत्यांची ताकद ही ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभी करण्याची गरज आहे.

ओबीसी (OBC) नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी नवीन राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नवा पक्ष काढून लढणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

follow us