MP Blast : फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू; आजूबाजूचा परिसरही हादरला

MP Blast : फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू; आजूबाजूचा परिसरही हादरला

Harda Factory Blast: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला, (Harda Factory Blast) यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 40 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (MP Blast) या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. स्फोटानंतर फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 50 घरे आगीत जळून खाक झाली आहेत. त्याचवेळी जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. सध्या 20 हून अधिक जखमींना हरदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपासच्या जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या गाड्याही हरदाकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

मगरधा रोडवर असलेल्या एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली. कारखान्यातून उठणाऱ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून पाहायला मिळत आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

तूरडाळचा भडका… जेवणातून वरण गायब! पण नेमकी कारणे काय?

सीएम मोहन यादव यांनी घेतली दखल, जखमींना लवकरात लवकर रुग्णालयांत हलविण्यास सांगितले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत मंत्री उदय प्रताप सिंह, एसीएस अजित केसरी, डीजी होमगार्ड अरविंद कुमार यांना हेलिकॉप्टरने हरदा येथे जाण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच भोपाळ आणि इंदूरमधील वैद्यकीय महाविद्यालये, भोपाळमधील एम्स आणि बर्न युनिटलाही आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय इंदूर आणि भोपाळ येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात येत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदतकार्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नर्मदापुरम येथूनही अनेक अग्निशमन गाड्या पोहोचत आहेत: हरदा फटाका कारखान्याला लागलेल्या आगीबाबत नर्मदापुरमहून हरदा येथे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पाठवण्यात येत आहेत. नर्मदापुरमचे कर्मचारीही हरदाला रवाना झाले आहेत. अधिकृत माहितीनुसार, नर्मदापुरम येथून 6 अग्निशमन दल आणि 4 रुग्णवाहिका डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह हरदाला रवाना झाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज